31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
HomeमुंबईSharad Pawar : शरद पवारांनी रस्त्यावर गाडी थांबवून दिला नव वधू-वरांना आशिर्वाद...

Sharad Pawar : शरद पवारांनी रस्त्यावर गाडी थांबवून दिला नव वधू-वरांना आशिर्वाद !

टिम लय भारी

मुंबई : पंढरपूर येथील दौ-या दरम्यान राष्ट्रवादी नेते शरद पवार (Sharad Pawar ) आणि नव वधू – वरांच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे राज्यात लाखो चाहते आहेत याचा प्रत्यय आज येथे आला. एका आपल्या चाहत्याला रस्त्यात गाडी उभी करून शरद पवार यांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी आशीर्वाद दिला. शरद पवारांच्या या प्रेमाने नववधू आणि वर अक्षरश: भारावून गेले.

दरम्यान, राष्ट्रवादी नेते शरद पवार हे शुक्रवारी पंढरपूर दौ-यात सर्वसामान्यांचा नेता असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. पंढरपूर तालुक्‍यातील गादेगाव येथील शेतकरी तरुण सूरज शिंदे यांचा काजल हिच्याबरोबर कालच (गुरुवारी) विवाह झाला होता. दरम्यान, आज (शुक्रवारी) शरद पवार पंढरपूर तालुक्‍यातील सरकोली येथे येणार असल्याची माहिती मिळताच सूरज आणि काजल हे दोन्ही नवविवाहित जोडपे पवारांच्या भेटीसाठी आले होते. दरम्यान, एखाद्या लोकप्रिय नेत्याची गाडी रस्त्यावर जाते. तेव्हा त्या गाडीच्या मागे – पुढे वाहनांचा मोठा ताफा असतो. या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही असतो. या ताफ्यातून निघणारा नेता चालत्या वाहनातूनच केवळ आपल्या चाहत्यांना हात हलवून अभिवादन करतो. एवढ्यावरच चाहते बेभान होतात. मात्र, याला छेद देत शरद पवारांनी रस्त्यावर गाडी थांबवून या नववधू – वरांना आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी