28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
HomeमुंबईStupid : शिवसेनेचे कार्यकर्ते मुर्ख : संजय निरुपम

Stupid : शिवसेनेचे कार्यकर्ते मुर्ख : संजय निरुपम

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना (Stupid activist) सत्य कधी समजणार? ७० वर्ष जुन्या दुकानाचे नाव बदलण्याची धमकी दिली जाते, हे चुकीचे आहे, असे ट्विट काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केले आहे.

शहरातील कराची स्वीट्स दुकानाचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी केली आहे. कराची स्वीट्स या नावामुळे देशातील सैनिकांचा अपमान होतो, असे नितीन नांदगावकर यांचे म्हणणे होते. त्यासाठी नांदगावकर यांनी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन तेथील मालकांना याबाबत निवेदन देत समज दिली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यात काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट केले की, भारतातल्या चायनीज हॉटेलचा चीनशी काही देणेघेणे नाही, तसेच वांद्रे येथील कराची स्वीट्सचे पाकिस्तानशी कोणतेही नाते नाही. हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार? ७० वर्ष जुन्या दुकानाचे नाव बदलण्याची धमकी दिली जाते, हे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी