28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
HomeमुंबईBest : बेस्ट प्रवाशांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा

Best : बेस्ट प्रवाशांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा

बेस्टची दररोजची कमाई दोन कोटी

टीम लय भारी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचा प्रवास सर्वांसाठी खुला नाही. त्यामुळे बेस्ट (Best) बस मुंबईतील दळणवळणाचे एक मुख्य साधन आहे. यामुळे बेस्ट बसला प्रवासी गर्दी करत आहेत. बेस्ट वाहतूक आता रुळावर आली आहे. दररोज २२ लाख जण बेस्टने प्रवास करत असून दोन कोटींचे उत्पन्न मिळत आहे. २० मार्च रोजी २० लाख प्रवासी बेस्टने प्रवास करत होते, तर एक कोटी १७ लाखांचे उत्पन्न मिळत होते.

मुंबईत कोरोनाचा संसर्ग सध्या वाढत आहे. गर्दी टाळणे हा त्यावर प्रभावी उपाय असल्याने अनलॉक झाल्यानंतरही मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेस्ट बसची गर्दी वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना प्रवासाची मुभा होती. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट बसची सेवा जूनपासून सुरू करण्यात आली आहे.. तर ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने बेस्ट प्रवासाची मुभा देण्यात आली होती. बेस्ट बसमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रवास केला जावा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार बेस्ट बसचे दररोज निर्जंतुकीकरण प्रत्येक प्रवासी फेरीनंतर करण्यात येत आहे. प्रवाशांच्या काळजीसाठी सर्व व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हणमंत गोफणे यांनी सांगितले.

मुंबईत बेस्ट बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने प्रवासी बसचा वापर करीत आहेत. सकाळी कामाला जाण्याच्या वेळी तसेच संध्याकाळी कामावरून सुटण्याच्या वेळी प्रवासी जास्त असतात. यावेळी सोशल डिस्टन्सची अडचण होत आहे. एकाच वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी