31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईखुशखबर! तृतीय पंथीयांना मिळणार हक्काची घरे; रामदास आठवले पाठपुरावा करणार

खुशखबर! तृतीय पंथीयांना मिळणार हक्काची घरे; रामदास आठवले पाठपुरावा करणार

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे नेहमी समाजातील उपेक्षित घटकांच्या मदतीला धावून येत असतात. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे ज्येष्ठ नागरिक दिव्यंजन यांच्यासोबत ट्रान्सजेंडर तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालय विविध योजनांद्वारे प्रयत्नशील आहे. त्यानुसारच तृतीयपंथीयांसाठी वेगळ्या वसाहती स्थापन करणे तसेच शहरांमध्ये एमएमआरडीए, म्हाडाच्या घरांमध्ये तृतीयपंथीयांसाठी काही घरे राखीव  ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.  बांद्रा पूर्व येथे रामदास आठवले यांच्या कार्यालयात  कायनात या व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट  असणाऱ्या ट्रान्सजेंडर यांनी आज ना.रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यावेळी आठवले बोलत होते.

तृतीयपंथीय हेसुद्धा माणूस आहे त्यांनासुद्धा अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा अधिकार आहे. तृतीयपंथीयांना समाजात घर भाड्याने घेताना किंवा घर विकत घेताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी वेगळ्या वसाहती स्थापन करणे तसेच शहरांमध्ये एमएमआरडीए, म्हाडाच्या घरांमध्ये तृतीयपंथीयांसाठी काही घरे राखीव  ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे ज्येष्ठ नागरिक दिव्यंजन यांच्यासोबत ट्रान्सजेंडर तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालय विविध योजनांद्वारे प्रयत्नशील आहे. त्यामुळे  म्हाडा, एमएमआरडीए सारख्या प्राधिकरणांच्या वसाहतींमध्ये तृतीयपंथीयांसाठी काही घरे राखीव ठेवण्यात यावी याबाबत आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.

हे सुद्धा वाचा 

भेसळखोरांवर कारवाई होणारच -धर्मरावबाबा आत्राम
संदिपान भुमरे यांचा कामाइतकाच लोकसंग्रह भलताच भारी
मुंबईत ‘जय श्रीराम’ म्हणण्याची जबरदस्ती, मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण!

बांद्रा पूर्व येथे रामदास आठवले यांच्या कार्यालयात  कायनात या व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट  असणाऱ्या ट्रान्सजेंडर यांनी आज रामदास आठवले यांची भेट घेतली. त्या मुळच्या बारामतीमधील असून मराठा समाजातून त्या येतात. मुंबईच्या बोरीवली येथे वास्तव्यात होत्या. त्यांचे राहते  घर  इमारत पुनर्विकास प्रकल्पात गेले. त्यामुळे त्या भाड्याने नवीन घर घेण्याच्या शोधात आहेत मात्र त्यांना बोरवली आणि परिसरात कुठेही भाड्याने घर मिळणे शक्य झालेले नाही. ट्रान्सजेंडर असल्यामुळे त्यांना कोणी घर भाड्याने देण्यास तयार नाही. समाजाची ट्रान्सजेंडरकडे बघण्याची ही दृष्टी चुकीची असल्याची भावना कायनात यांनी व्यक्त केली.

त्यामुळे तृतीयपंथीयांच्या  ट्रान्सजेंडरच्या प्रश्नावर भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्रालय काम करीत असून ट्रान्सजेंडरच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तृतीयपंथीयांना म्हाडा एमएमआरडीए सारख्या प्राधिकरणांमध्ये घरे राखीव ठेवण्याची आपण मागणी करणार आहोत असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच समाजानेही तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांनाही माणूस म्हणून आपण स्वीकारले पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी