30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
HomeमुंबईUrmila Matondkar : पतीला दहशतवादी म्हटल्याने उर्मिला मातोंडकर ट्रोलर्सवर संतापल्या

Urmila Matondkar : पतीला दहशतवादी म्हटल्याने उर्मिला मातोंडकर ट्रोलर्सवर संतापल्या

टिम लय भारी

मुंबई : बॉलीवूडची प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी कॉंग्रेसचा हात सोडून शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेशही केला. अलिकडेच मातोंडकर यांना त्यांच्या पतीच्या धर्मावरुन ट्रोलर्सने सोशल मिडियावरून लक्ष्य केले आहे. त्यावर मातोंडकर संतापल्या असून त्यांनी ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे.

उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, माझे पती मोहसीन अख्तर मीर ( Mohsin Akhtar Mir) यांच्याबद्दल सोशल मीडियावर उलट्या-सुलट्या अफवा पसरवल्या जात आहेत. मोहसिन यांना दहशतवादी आणि पाकिस्तानी म्हटले गेले आहे. काही लोकांनी माझ्या विकीपिडीया पेजवर बदल केले होते. त्यात माझ्या आई-वडिलांचे बदलले आहे. आईच नाव रुखसाना अहमद आणि वडिलांचे नाव शिविंदर सिंह असे केले होते, त्यांच्या वडिलांचे खरे नाव श्रीकांत मातोंडकर आणि आईचं नाव सुनीता मातोंडकर आहे.

मातोंडकर यांचे पती मोहसिन अख्तर मीर यांचे 2016 मध्ये लग्न झाले होत. ते काश्मिरी मुस्लीम असून पेशाने मॉडेल आणि व्यावसायिक आहेत. त्यांच्या लग्नाची बरीच चर्च रंगली होती. तेव्हाही ते ट्रोल झाले होते. आता उर्मिला राजकारणात सक्रीय झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दोघांना ट्रोल केले जात आहे. मातोंडकर यांनी धर्मावर किंवा लग्नावरुन ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दल संताप व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी