30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeमुंबईRaj Thakare : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये

Raj Thakare : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये

टिम लय भारी

मुंबई : २००९ साली राज ठाकरे (Raj Thakare) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. आता मनसे हा फक्त मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरात अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. परंतू, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका मनसे लढवेल अशी घोषणा केली. आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाला. पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि १८) बारामतीमध्ये चार तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला. मनसे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पाटसकर यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, मनसे जर गाव पातळीवरच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरली तर याचा फटका नेमका महाविकास आघाडीला बसणार की भाजपला हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. ठाकरे यांच्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे सर्व मनसे नेते, जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष हे वेगाने तयारीला राहिले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. सध्या रिव्हर्स मोडवर असलेले मनसे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नशीब आजमावत पुन्हा एकदा रुळावर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळविला आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे पॅनल उभे करणार आहे. जिथे शक्य नाही तिथे युती करून निवडणूक लढणार असल्याचा निर्णय आज बारामती मध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मनसेचे नेते वागस्कर,प्रदेश उपाध्यक्ष पाटसकर, जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. विनोद जावळे मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या बैठकीत बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.आम्ही चार तालुक्यातील ७० टक्के जागा लढविण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. यावेळी सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे वागसकर म्हणाले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. काही ठिकाणी मनसे पॅनल उभा करणार आहे,तर जिथे शक्य नाही तिथे युती करून लढुन ग्रामपंचायतीमध्ये शिरकाव करणार असल्याचे वागसकर यांनी सांगितलं

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी