29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयराहुल गांधी यांचे संसदेत आगमन; विरोधकांमध्ये संचारला उत्साह

राहुल गांधी यांचे संसदेत आगमन; विरोधकांमध्ये संचारला उत्साह

मोदी आडनाव बदनामी प्रकरणातील खटल्यात राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांचे रद्द केलेले लोकसभा सदस्यत्त त्यांना पून्हा बहाल करण्यात आले आहे. सोमवारी त्यांचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर अवघ्या दिड तासांत राहुल गांधींचे संसदेत आगमन झाले. यावेळी काँग्रेससह इंडिया आघाडीतील नेत्यांनी जोरदार घोषणा देत त्यांचे स्वागत केले.

संसदेत आल्यानंतर शरद पवार, संजय राऊत तसेच अनेक नेत्यांची राहुल गांधी यांच्याशी भेट झाली. विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला असून या प्रस्तावाच्या चर्चेत राहुल गांधी सहभागी होणार असल्याची चर्चा देखील होत आहे. राहुल गांधी यांच्या आगमनामुळे विरोधी पक्ष आता आणखी आक्रमकपणे लढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पुन्हा ”मेंबर ऑफ पार्लमेट” असा उल्लेख केला आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षभरात १०० कोटी रुपयांची मदत

भाजपाने थाळ्या वाजवून देशात दारिद्र्य आणले- नाना पटोले यांची सरकारवर टीका

अठरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; महसूल आणि वन विभागाच्या प्रधान सचिवपदी सोनिया सेठी

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे रद्द केलेले सदस्यत्व पून्हा बहाल केल्याने विरोधी पक्षांमध्ये जल्लोशाचे वातावरण आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सोशल मीडियातून राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहीत पवार यांनी राहुल गांधी यांचे लोकसभेत आगमन करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ”अन्यायी पद्धतीने काढलेली खासदारकी न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा मिळाल्याने, संसदेत लोकशाहीचा आवाज पुन्हा अधिक बुलंद होणार आहे! शिवाय जनतेचा आवाज बंद करण्याचा प्रकार पुन्हा होऊ नये, म्हणून येत्या निवडणुकीत लोकांच्या माध्यमातून परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही!” असे देखील रोहीत पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी