31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयकाश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा : नितेश राणे

काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा : नितेश राणे

टीम लय भारी

मुंबई: नाशिक येथे हिंदू देवदेवतांची विटंबना केल्या प्रकरणी आज नाशिकमध्ये नितेश राणे (Nitesh rane) पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या प्रकरणावर भाष्य करत, महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज्यात हिंदूच्या देवांची अशा प्रकारे विटंबना केली जात आहे,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजेच बाळासाहेबांचा मुलगा हे कस सहन करू शकतात असा सवाल नितेश राणे (Nitesh rane यांनी केला आहे.

शरद पवारांवर एक पोस्ट लिहिली तिला आत टाकली, मग अशी विटंबना करणारे लोक का सापडत नाही, हिंदू संघटनांनी संयम सोडला तर बोलू नका, संबंधितांवर कारवाई झाली नाही तर आमचा संयम सुटेल या कडक शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

पुढे त्यांनी संजय राऊत यांनी केल्या विधानावर चांगला समाचार घेतला. “काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही इथलं सांभाळा”. मुख्यमंत्री असताना आमदारांना कोंडून ठेवावं लागतं, यातूनच काय उगवलं आहे हे कळतं असा टोला लगावताना नितेश राणे यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री तुमच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून आली आहे का? मनसेचा सवाल

Opposition demands Nupur Sharma’s arrest as more Muslim countries condemn her comment against Proph

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी