27 C
Mumbai
Thursday, June 27, 2024
Homeमहाराष्ट्रअपेक्षा आहे विरोधी पक्षनेते गडकरींचा सल्ला मानतील : रोहित पवार

अपेक्षा आहे विरोधी पक्षनेते गडकरींचा सल्ला मानतील : रोहित पवार

टीम लय भारी

मुंबई :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या या काळात विरोधी पक्षनेते राजकारण करत आहेत. करोना परीस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोध सतत एकमेकांवर टीका करत आहेत. समाजसेवा करताना राजकारण (Politics) करू नये, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. अपेक्षा आहे विरोधी पक्षनेते गडकरींचा (Gadkari) सल्ला मानतील असा रोहित पवारांनी भाजपला सल्ला दिला आहे(It is expected that the Leader of the Opposition will follow Gadkari advice Rohit Pawar has advised the BJP).

राजकारण (Politics) करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नितीन गडकरी यांनी खडे बोले सुनावले आहेत. रविवारी नागपूर कार्यकारिणी बैठकीत नितीन गडकरी (Gadkari) यांनी कार्यकर्त्यांना साथीच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच यावेळी पक्षाने बरीच कार्यकर्ते गमावली आहेत, म्हणून प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे आणि समाजसेवा करताना राजकारण (Politics) करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. याचा हवाला देत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील भाजपाला सल्ला दिला आहे.

सु्प्रीम कोर्टाला टास्क फोर्स स्थापना करावी लागते, केंद्र सरकार काय करतेय ? : बाळासाहेब थोरातांचा सवाल

विराट कोहलीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, लस घेतल्यानंतर चाहत्यांसाठी स्पेशल मॅसेज

Teachers’ unions rage against the UP government as 135 members die from Covid-19 after poll duty

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “कोविडची लढाई लढत असताना आजच्या अडचणीच्या काळात कुणीही राजकारण (Politics) करू नये’, हा सन्माननीय नितिन गडकरी (Gadkari)  साहेबांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. ते देशातले मोठे नेते आहेत. माझ्यासारखे अनेकजण त्यांच्याकडून शिकत असतात. अपेक्षा आहे राजकारण (Politics) करणारे, त्यांचा हा सल्ला मानतील!”

काय म्हणाले नितीन गडकरी

गडकरी (Gadkari) म्हणाले, समाजसेवेत राजकारण (Politics) करू नका कारण केवळ तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय कार्यकर्त्यांसह भाजपाला जाईल. हा साथीचा रोग किती काळ टिकेल हे कोणालाही माहिती नाही, म्हणून आपण सर्वोत्कृष्ट विचार केला पाहिजे आणि सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहावे.

कार्यकर्त्यांना राजकारणाचा (Politics) खरा अर्थ सांगताना केंद्रीय मंत्री गडकरी (Gadkari) म्हणाले की, राजकारण (Politics) म्हणजे केवळ सत्तेत राहणे नव्हे तर ते सामाजिक कार्य आणि राष्ट्रवाद आहे, ‘आपण जाती, धर्म किंवा पक्षाचा विचार न करता समाज आणि गरिबांच्या पाठीशी उभे राहून सर्वांना मदत केली पाहिजे.

भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला दिला होता घरचा आहेर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील विविध राज्यांत आरोग्य सुविधा कोलमडल्याचे दृश्य आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे जीव जात असून, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांकडून केंद्र सरकारला फटकारले जात आहे. देशातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सूत्रे देण्याचा सल्ला भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला दिला होता. परंतु, त्याची सरकारकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.

त्यानंतर शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने देशातील ऑक्सिजन वितरण प्रणालीसंदर्भात १२ सदस्यीय समिती नियुक्त केली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. स्वामी यांनी ट्विट करत सरकारला घरचा आहेर दिला. “जर मोदींनी गडकरींबद्दलचा प्रस्ताव स्वीकारला असता, तर करोनाविरोधातील लढाई सरकारच्या नियंत्रणात असती. आता सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नियुक्त केली आहे. त्या प्रस्तावावर सॉलिसिटर जनरलने आत्मसमर्पणच केले. एका लोकशाही देशात हा आदेश सरकारविरोधी आहे,” अशी टीका स्वामी यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी