31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजतीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा

तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा

टीम लय भारी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे (PM Modi announces repeal of three agriculture laws).

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरूवात झाली. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्राने विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या फायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवले.

Narendra Modi : शेतक-यांना अधिकार दिला, कृषी कायद्यात चुकीचे काय?

Narendra Modi : किसान योजना PM मोदी आज 6 राज्यातील शेतकर्‍यांशी साधणार संवाद, शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवणार 18 हजार कोटी

सोबतच, हे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकले नाही. या तपस्येत कमी राहिली असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळी केली. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय.

Narendra Modi यांचे संतापजनक आवाहन

PM’s address to the nation live updates: Three new farm laws to be repealed, PM Narendra Modi says

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी