28 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजगांधी, नेहरू, आंबेडकर विचारधारेच्या संपादकांवर ‘महाविकास आघाडी’ सरकारकडून गुन्हा दाखल

गांधी, नेहरू, आंबेडकर विचारधारेच्या संपादकांवर ‘महाविकास आघाडी’ सरकारकडून गुन्हा दाखल

टीम लय भारी

मुंबई : गांधी, नेहरू व आंबेडकरांच्या विचारसरणी जपत आक्रमक पत्रकारिता करणारे संपादक संजय आवटे ( Sanjay Awate ) यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर औरंगाबादमध्ये दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संतापजनक म्हणजे, सनदी अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडणारी बातमी छापल्याने संबंधित अधिकाऱ्यांचा ‘इगो’ हर्ट झाला, अन् त्यातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय आवटे हे ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडीटर आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोरोना’बाबत लेखवजा बातमी प्रसिद्ध केली होती. औरंगाबादमध्ये ‘कोरोना’चा कहर वाढत चालला आहे. मृत्यूही वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘२०६ नागरिकांचे मारेकरी कोण ?’ असा बातमीवजा लेख ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झाला होता.

Police filed complaint against Sanjay Awate
याच बातमीमुळे सनदी अधिकाऱ्यांचे पित्त खवळले

या बातमीमध्ये ‘नापासांची फौज’ या शिर्षकाखाली एक चौकट प्रसिद्ध केली होती. यामध्ये महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद या तिन्ही अधिकाऱ्यांवर टीका केली होती.

सनदी अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने औरंगाबादमध्ये ‘कोरोना’ वाढत असल्याचा वस्तुस्थितीदर्शक मजकूर या बातमीमध्ये होता. परंतु आपल्या विरोधात बातमी छापली म्हणून सनदी अधिकाऱ्यांचे पित्त खवळले आणि त्यांनी आवटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला ( Aurangabad administration filed complaint against Divya Marathi).

Police filed complaint against Sanjay Awate
गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘दिव्य मराठी’ने मुजोर सनदी अधिकाऱ्यांना प्रती आव्हान दिले आहे

या प्रकारामुळे पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला आहे. सनदी अधिकाऱ्यांनी आकस ठेवून गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी करावी व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी विविध पत्रकार संघटनांनी

‘दिव्य मराठी’चे प्रती आव्हान

सामान्य लोकांची बाजू मांडली म्हणून गुन्हे दाखल केले जात असतील, तर असे गुन्हे आम्ही पुन्हा करू अशा शब्दांत संजय आवटे यांनी ठणकावले आहे. आवटे यांनी ही भूमिका ‘दिव्य मराठी’मध्ये ठळकपणे मांडली आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रालयातील हा ‘फोटो’ सांगतोय; तुम्ही कितीही मोठे असाल, पण खूर्ची गेली की शान आणि दराराही जातो

मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी : दिलीप सपाटे

दिव्य मराठीने कोरोनाचा वाढता प्रादूर्भावाबाबतची वस्तुस्थिती समोर आणली. प्रशासनाला आलेले अपयश वृत्तपत्रातून मांडले. औरंगाबादमध्ये ‘कोरोना’ नियंत्रणात आणण्यामध्ये प्रशासनाची टीम नापास ठरले हे खरेच आहे. ही वस्तुस्थिती मांडली म्हणून पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी मुस्कटदाबी करीत असतील तर हे पुरोगामी पत्रकारितेसाठी धोकादायक आहे. अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याअगोदर सरकारची परवानगी घेतली होती का याविषयी सुद्धा शंका आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन हे गुन्हे तात्काळ मागे घेतले पाहीजेत. पत्रकारितेवरील दबावाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. – दिलीप सपाटे, अध्यक्ष, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ

प्रशासनाचा जाहीर निषेध – एस. एम. देशमुख

‘दिव्य मराठी’वर दाखल केलेला गुन्हा हा माध्यमांची मुस्कटदाबी व पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रकार आहे. ‘कोरोना’ रोखण्यात प्रशासन नापास ठरले आहे. पण मूळ मुद्दा सोडून प्रशासन चोख पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल करीत आहे. याचा आम्ही निषेध करीत आहोत. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उद्या औरंगाबाद जिल्ह्यातील सगळे पत्रकार काळ्या फिती लावून काम करतील. सर्व तहसिलदारांना पत्रकार ठिकठिकाणी पत्र देवून गुन्हे दाखल करण्याची मागणी करतील. – एस. एम. देशमुख, मुख्य विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद

Mahavikas Aghadi

गृहमंत्र्यांशी बोलणार : काँग्रेस

‘महाविकास आघाडी’ मीडियावर कधीही दबाव आणत नाही. ‘दिव्य मराठी’वर झालेली कारवाई ही अधिकाऱ्यांनी पर्सनली घेऊन केलेली आहे. खरेतर, दिव्य मराठीने दिलेल्या बातमीतून अधिकाऱ्यानी बोध घ्यायला हवा होता. याबाबत मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणार आहे. मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे. – राजू वाघमारे, प्रवक्ते, काँग्रेस

‘दिव्य मराठी’ने चोख जबाबदारी पार पाडली आहे : विनोद जगदाळे

‘दिव्य मराठी’ने बातमीदारीची चोख जबाबदारी बजावली आहे. पण त्यामुळे प्रशासनाला मिरची झोंबली. प्रशासनाने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने त्यात लक्ष घालून तात्काळ गुन्हे मागे घ्यायला हवेत. – विनोद जगदाळे, अध्यक्ष, टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन

अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी : राष्ट्रवादी काँग्रेस

अधिकाऱ्यांनी केलेल्या मनमानीपणाचा मी प्रथम जाहीर निषेध करतो. या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करायला हवी. अधिकाऱ्यांनी मनमानीपणे हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रकार केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही संजय आवटे ( Sanjay Awate ) यांच्या बरोबर आहोत. – विकास लवांडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

MoneySpring 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी