29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमंत्रालयखळबळजनक : पीडब्ल्यूडीतील मोठा घोटाळा, घोटाळेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी मंत्रालयात शिजतेय कारस्थान

खळबळजनक : पीडब्ल्यूडीतील मोठा घोटाळा, घोटाळेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी मंत्रालयात शिजतेय कारस्थान

टीम लय भारी

मुंबई : सन 2014 मध्ये पीडब्ल्यूडीतील एक घोटाळा समोर आला होता. यांत साधारण 50 अधिकारी दोषी होते. पण त्यातील 13 जणांना तडकाफडकी निलंबित केले होते. आता हे संपूर्ण प्रकरणच दडपण्याचे कारस्थान मंत्रालयात शिजत आहे ( PWD engineers was suspended for scam ).

सन 2014 मध्ये प्रस्तुत प्रतिनिधीनेच पीडब्ल्यूडीतील एक प्रकरण दैनिक ‘सकाळ’ व ‘साम टिव्ही’च्या माध्यमातून चव्हाट्यावर आणले होते. ही बातमी प्रसिद्ध होताच दोनच दिवसांत सरकारने 13 कनिष्ठ अभियंत्यांना निलंबित केले होते ( PWD scam was exposed by Tushar Kharat in 2014 ).

निलंबित केलेल्या 13 अधिकाऱ्यांची नावे – एस. डब्ल्यू. चव्हाण, व्ही. जी. देशपांडे, व्ही. एच. अहिरे, डी. ए. पाटील, जी. एम. गावकर, एस. बी. सोनानीस, जी. डी. डोंबाळे,  आर. बी. परदेशी, आर. एच. जगदाळे, ए. ई. पनाड, ए. एन. जाधव, व्ही. पी. पाटील, एस. बी. घरत.

वास्तवात, तत्कालिन मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांनी एकूण 31 कनिष्ठ अभियंत्यांना या घोटाळ्यासाठी जबाबदार धरले होते ( PWD Chief Engineer C. P. Joshi was given 31 officers report to government ). पण त्यापैकी 13 जणांवरच कारवाई केली. या 13 पैकी परदेशी व अहिरे हे कारवाईच्या अगोदरच निवृत्त झाले होते.

घोटाळ्यासाठी जबाबदार धरलेले 31 पैकी अन्य अधिकारी – एस. डी. घाडगे, एस. टी. रायपुरे, ओ. ए. पाटील, डी. बी. मुळे, पी. व्ही. ठाकरे, एस. पी. सुर्यवंशी, एम. डी. बच्चेवार, एस. जे. शहाणे, एम. व्ही. मांजरेकर, एम. सी. शिकलगार, एस. डी. डावकर, जी. एस. कटके, पी. डी. धुंदूर, पी. व्ही. जाधव, व्ही. व्ही. कट्टी, एस. एस. चव्हाण, एस. एस. माने, ए. आर. घडले.

प्रस्तुत प्रतिनिधीने लिहिलेली बातमी प्रसिद्ध होताच राज्य सरकारने मोठी कारवाई केली होती. सरकारच्या सुचनेनुसार तत्कालिन मुख्य अभियंता सी. पी. जोशी यांनी कारवाईचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांना पाठवला होता ( IAS Anand Kulkarni was Additional Chief secretary for PWD department ). त्यानंतर वरील 31 पैकी 13 जणांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते ( IAS Anand Kulkarni suspended to 13 Jr. engineer ).

अहवाल पाठविताना सी. पी. जोशी यांनी त्यावेळी खोडसाळपणा केला होता. या 31 अधिकाऱ्यांपेक्षाही मोठ्या घोटाळेबाज असलेल्या अधिकाऱ्यांना वाचविले होते. उप अभियंते व कार्यकारी अभियंते यांचाही त्या घोटाळ्यात हात होता. पण जोशी यांनी सखोल चौकशी केलीच नाही (C.P. Joshi was hide real culprits of PWD scam ). उलट जवळपास 15 ते 20 उप अभियंते व कार्यकारी अभियंते यांना मोकाट सोडले.

हे सुद्धा वाचा

मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे सरकारी बंगल्याबाहेर; पीडब्ल्यूडीच्या कारभाराचा नमुना

सनदी अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान, पीडब्ल्यूडीत ३५८ कोटीचा घोटाळा

पीडब्ल्यूडी भ्रष्टाचार : फडणवीस सरकारने 90 कोटींची खोटी बिले अडवली, ठाकरे सरकारने ती ‘कोरोना’ काळात मंजूर केली

मुख्यमंत्र्यांनी बदल्यांच्या घोडेबाजाराला लावला चाप

तीसरे मोर्चे की तैयारी नहीं:शरद पवार के घर हुई मीटिंग का एजेंडा थर्ड फ्रंट नहीं; राकांपा नेता ने कहा- मीटिंग उन्होंने नहीं बुलाई

निलंबित केलेल्या या 13 पैकी 11 अभियंत्यांना वर्षभरानंतर परत सेवेत घेण्यात आले. तत्कालिन मुख्य अभियंता असलेले सी. पी. जोशी यांची कालांतराने पदोन्नती झाली व ते सचिव पदावर गेले (C. P. Joshi was promoted to Secretary for PWD department).

सचिव पदावर असताना त्यांनी आपल्या खोडसाळ स्वभावाला अनुसरून मेख मारण्याचे काम केले. निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी ‘हे प्रकरण गंभीर नाही’ अशा प्रकारचा शेरा या प्रकरणाच्या फाईलवर मारून ठेवला. त्यांच्या या शेऱ्यामुळे सगळ्याच अधिकाऱ्यांना आता क्लिन चीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

घोटाळा काय होता ?

पीडब्ल्यूडीतील अधिकारी व कंत्राटदार यांची मिलीभगत आहे. संगनमताने ही मंडळी बोगस कामे करतात, व सरकारचा निधी हडपतात. याचा पर्दापाश त्यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीने केला होता.

अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाच्या तब्बल 250 मोजमाप पुस्तिका कार्यालयाबाहेर गेल्या होत्या. वांद्रे येथील कलानगर गेस्ट हाऊसमधील अडगळीतील एका खोलीत या 250 पुस्तिका सापडल्या होत्या ( PWD’s MB books finds with Contractors ). शोधक पत्रकारीता करताना प्रस्तुत प्रतिनिधीनेच या खोलीवर धडक मारली होती ( Journalist Tushar Kharat was done investigative journalism ).

शोधक पत्रकारितेच्या या बातमीमुळेच पीडब्ल्यूडी घोटाळा उजेडात आला होता

त्यानंतर ‘लाच लुचपत प्रतिबंधक’ खात्याच्या अधिकाऱ्यांनी या 250 मोजमाप पुस्तिका ताब्यात घेऊन त्या तत्कालिन मुख्य अभियंता व तत्कालिन अधिक्षक अभियंता सी. व्ही. तुंगे यांच्याकडे सोपविल्या होत्या. अडगळीतील त्या खोलीत ‘व्हीआयपी’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले तीन कंत्राटदार वर्षानुवर्षे संशयास्पद उपद्व्याप करायचे.

या कंत्राटदारांच्या ताब्यात 250 मोजमाप पुस्तिका गेल्याने त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. सरकारची करोडो रूपयांची कामे PWD अधिकारी व कंत्राटदार एकत्रित मिळून करतात. अधिकाऱ्यांनी मोजमाप पुस्तिकेत कामाच्या ज्या नोंदी करायला हव्यात, त्या कंत्राटदार करीत असल्याचाही धक्कादायक प्रकार त्यामुळे उघड झाला होता.

तत्कालिन सरकारने हे प्रकरण गांभिर्याने घेतले. पण तत्कालिन मुख्य अभियंते व नंतर सचिव पदावर पदोन्नती झालेले सी. पी. जोशी यांनी या प्रकरणाची कसलीच चौकशी केली नाही ( C. P. Joshi hides PWD scam ). या प्रकरणाच्या मुळाशी तर ते गेले नाहीतच, उलट त्यांनी चार वर्षे हे प्रकरण भिजत ठेवले, अन् शेवटी ‘प्रकरण गंभीर नाही’, असा खोटारडा शेरा मारल्याचे आता निदर्शनास आले आहे.

सी. पी. जोशी यांनी दडपलेल्या या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करायला हवी. कनिष्ठ अभियंत्यांबरोबरच त्यावेळचे उप अभियंते व कार्यकारी अभियंते यांच्यावरही कारवाई करायला हवी. घोटाळेबाजांना पाठीशी घालून सरकारला चुना लावमाऱ्या सी. पी. जोशींवरही कारवाई करायला हवी, तरच PWD मधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना आळा बसेल, अशी भावना जनमाणसांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी