31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयजिनके हाथ खून से रंगे हो, वो... चाकणकरांची केंद्रीय मंत्रिमंडळावर बोचरी टीका...

जिनके हाथ खून से रंगे हो, वो… चाकणकरांची केंद्रीय मंत्रिमंडळावर बोचरी टीका…

टीम लय भारी

मुंबई :- केंद्रीय मंत्रिमंडळाचे विस्तार झाल्यापासून या मंत्रिमंडळावर टीकास्त्र सुरू आहे. राष्ट्रवादीने केंद्रीय मंत्रिमंडळाला धारेवर धरले आहे. जिनके हाथ खून से रंगे हो, वो क्या इंसाफ देंगे आपको, अशा शब्दात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची केंद्रीय मंत्रिमंडळावर बोचरी टीका केली आहे (Rupali Chakankar has criticized the Union Cabinet).

7 जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाचे विस्तार झाला. त्या दिवसापासून मंत्रिमंडळावर टीकास्त्र सुरू आहे. आज रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले यात त्या म्हणाल्या की, देशाच्या मंत्रिमंडळातील ४२% मंत्र्यांवर खून, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारांच्या शासनात आपण कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. जिनके हाथ खून से रंगे हो, वो क्या इंसाफ देंगे आपको, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळावर बोचरी टीका केली आहे.

मंत्र्यांची संख्या वाढली; पण कोरोना लसीची नाही, राहुल गांधीचा मोदींना टोला

येत्या वर्षात महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुयारी मार्ग तयार होणार

रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी सुद्धा ट्विट करून भाजपला टोला लगावला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ‘राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावे आणि नव्याने मंत्रीपदी विराजमान होणाऱ्यांची नाव वाचून असं वाटतंय इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल.’ असा खोचक टोला रुपाली चाकणकरांनी भाजपला लगावला होता (Rupali Chakankar had slammed the BJP).

पृथ्वीच्या दिशेने येत आहे एक सौरवादळ

20 BJP Office-bearers Quit Party In Beed Over Exclusion Of Pritam Munde From Union Cabinet

Rupali Chakankar has criticized the Union Cabinet
रुपाली चाकणकर

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात, भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मात्र, यात काही इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. याच मुद्यावरुन रुपाली चाकणकर यांनी भाजपला टोला लगावला होता.

भारतीय जनता पक्षातील 12 मंत्र्यांचा राजीनाम घेण्यात आला होता. या मंत्र्यांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही मंत्र्यांची बढती करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. यात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नारायण राणे आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या खासदार भारती पवार यांचाही समावेश आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या वतीने ही टीका करण्यात आली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी