35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय‘राजेश टोपे यांना राज्यात फिरू देणार नाही’

‘राजेश टोपे यांना राज्यात फिरू देणार नाही’

टीम लय भारी

कराड : राज्य सरकारने आरोग्य सेविकांना कामावरुन कमी करण्याचा दिलेला आदेश बेकायदेशीर असून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अ‍ॅड. अमर मुल्ला यांनी आश्वासन दिले. हा निर्णय तात्काळ मागे नाही घेतला तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे (Rajesh Tope will not be allowed to roam in the state).

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करुनही कामावरुन कमी केलेल्या आरोग्य सेवकांची बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये अ‍ॅड. मुल्ला, शितल शिंदे, तब्बसूम मुल्ला, मंगल मुळीक, सविता रुपनर, रुक्मिणी साळुंखे आदींसह महिला उपस्थित होत्या. कोरोना काळात आरोग्य सेविकांनी स्वत:च्या कुटुंबाची काळजी न करता रुग्णांची सेवा केली. त्याचे फळ म्हणून राज्य सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणार्‍या आरोग्य सेविकांना कमी करून अन्याय केला. त्यामुळे आरोग्य सेविकांना आत्महत्या करण्या शिवाय पर्याय राहणार नाही.

राजकारणापेक्षा जावलीच्या विकासाला नेहमीच प्राधान्य : आमदार शिवेंद्रसिंहराजे

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीने कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या डोळ्यात अश्रू

या आरोग्य सेविकांनी अ‍ॅड. मुल्ला यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. त्यावर अ‍ॅड. अमर मुल्ला यांनी महाराष्ट्र सरकारचे आरोग्य सेविकांना कमी करण्याचा आदेश बेकायदेशीर आहेत. या आदेशाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.  आरोग्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे.

एसटी महामंडळाच्या मदतीला अजित पवार आले धावून

Maharashtra: Need 2 crore doses per month to scale up drives, says minister Rajesh Tope

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी