28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रऑगस्टमध्ये सहा महिन्यातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या!

ऑगस्टमध्ये सहा महिन्यातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या!

टीम लय भारी

मुंबई : राज्यात दुसरी लाटेनंतर मागील सहा महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात १ लाख ५८ हजार ८३० रुग्ण आढळून आले, तर २, ४१७ मृत्यूंची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्या सरासरी ५ हजारांपर्यंत खाली आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही ५० हजारांच्या घरात आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात असल्याचे आकडेवारी सांगते (August saw the lowest number of patients in six months).

महाराष्ट्रात आजवर ६४ लाख ६५ हजार इतके कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातील ६२ लाख ७३ हजार रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के इतके आहे. राज्यात आजवर १ लाख ३७ हजार ३१३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यात सध्या ५१ हजार सक्रिय रुग्ण आहेत. यातील १७ हजार रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात ८ हजार ५९३ (१७ टक्के) रुग्ण गंभीर आहेत. आयसीयूमध्ये ३ हजार ३८९ (७ टक्के), व्हेंटीलेटर्सवर १ हजार ४१० (३ टक्के), ऑक्सिजनवर १ हजार ९७९ (४ टक्के) तर आयसीयूबाहेरील ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या ५ हजार २०४ (१० टक्के) इतकी आहे. तर लक्षणविरहित अथवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या २६ हजार ४२३ (५१ टक्के) इतकी आहे.

राजकारणापेक्षा जावलीच्या विकासाला नेहमीच प्राधान्य : आमदार शिवेंद्रसिंहराजे

‘राजेश टोपे यांना राज्यात फिरू देणार नाही’

१७ जिल्ह्यांत केवळ ५०६ सक्रिय रुग्ण

राज्यातील निम्म्या म्हणजेच १७ जिल्ह्यांत ३१ ऑगस्ट रोजी केवळ ५०६ इतके सक्रिय रुग्ण आहेत. यात विदर्भातील, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांचा समावेश आहे. गोंदिया २, नंदुरबार ३, वर्धा ५, भंडारा ७, वाशिम ८, यवतमाळ ८, जालना १७, अकोला १७, धुळे २२, नांदेड २७, गडचिरोली ३२, परभणी ३८, बुलढाणा ४४, जळगाव ४९, हिंगोली ५९, नागपूर ७०, आणि अमरावती ९५ आदी १७ जिल्ह्यांत केवळ ५०६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे निम्मा महाराष्ट्र कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे आजच्या घडीचे चित्र आहे (Today picture is that Maharashtra is moving towards coronation).

August saw the lowest number of patients in six months
कोरोनाची सर्वाधिक कमी रुग्णसंख्या

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीने कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या डोळ्यात अश्रू

Coronavirus live updates: Kerala reports 32,097 fresh Covid-19 cases, 188 deaths

पाच जिल्ह्यांत ७० टक्के सक्रिय रुग्ण

राज्यातील पाच जिल्ह्यांत ७० टक्के सक्रिय रुग्ण आहेत. यात सर्वाधिक पुण्यात १३ हजार ५१५ (२७ टक्के) रुग्ण, ठाण्यात ७ हजार ८१ (१४ टक्के) रुग्ण, साताऱ्यात ५ हजार ६०२ (११ टक्के) रुग्ण, अहमदनगरमध्ये ५ हजार ४४१ (१० टक्के) रुग्ण तर सांगलीत ४ हजार २६० (८ टक्के) रुग्ण असे एकूण ७० टक्के रुग्ण सक्रिय आहेत. सोलापूरमध्ये ३ हजार ७३७ (७ टक्के), मुंबईत ३ हजार ४६९ (६ टक्के), कोल्हापूरात १ हजार ३९७ (३ टक्के), रत्नागिरी १ हजार ४५ (२.०), सिंधुदुर्ग ९७७ (२ टक्के) असे ५ जिल्ह्यांत २० टक्के सक्रिय रुग्ण आहेत. याचाच अर्थ केवळ १० जिल्ह्यांत राज्यातील ९० टक्के सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. या १० जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ६ ते ३ टक्केपर्यंत आहे. राज्याचा सध्या पॉझिटिव्हिटी दर अडीच टक्के इतका आहे.

महिना     रुग्ण       दैनंदिन सरासरी रुग्ण        मृत्यू     मृत्यूदर

फेब्रुवारी    १,३१, ३१६     ४,६९०                   १४६४            १.११

मार्च      ६,५७, ९१०     २१, २२२                 ६,०८९     ०.९३

एप्रिल     १७, ८९, ४०६   ५९, ६४७              २९, ६०६    १.६५

मे        ११, ५५, ५७०   ३६, १११                 २८, ६५५    २.४८

जून       ३, १६, २८३    १०, ५४३                 ७, ८२३     २.४७

जुलै       २, ३९, ८६३    ७, ७३८                  ३, ९१८     १.६३

ऑगस्ट     १, ५८, ८३०   ५, १२४                   २,४१७      १.५२

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी