मुंबईराजकीय

भाजपाला मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज, राणा दांपत्यांना ‘बंटी आणि बबली’ म्हणत संजय राऊतांची जोरदार टिका

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे राजकीय वातावरण आणि शिवसैनिक चांगलंच तापलं आहे. मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून राणा दांपत्याला तोडीसतोड उत्तर देण्याची तयारी केली आहे.

टीम लय भारी

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे राजकीय वातावरण आणि शिवसैनिक चांगलंच तापलं आहे. मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी (Sanjay raut) गर्दी केली असून राणा दांपत्याला तोडीसतोड उत्तर देण्याची तयारी केली आहे. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राणा दांपत्यावर जोरदार टीका केली आहे. (Sanjay raut criticize on navnit rana and ravi rana)

भाजपाला मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज, राणा दांपत्यांना 'बंटी आणि बबली' म्हणत संजय राऊतांची जोरदार टिका

‘बंटी आणि बबली’ मुंबईत पोहोचले असतील तर पोहोचू द्या. हे फिल्मी लोक आहेत. ही स्टंटबाजी, मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आणि भाजपाला आपलं मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज लागत आहे. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व काय आहे हे माहिती आहे. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत, असं संजय राऊतांनी (Sanjay raut) राणा दांपत्यावर खडसावून टिका केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Navneet Kaur Rana (@navneetravirana)

हनुमान चालीसा वाचणे हा श्रद्धेचा विषय आहे, पण भाजपने हिंदुत्वाची नौटंकी करून ठेवली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा ही याच नौटंकीमधील पात्र आहेत. परंतु, भाजपच्या हिंदुत्वाच्या नौटंकीला जनता गांभीर्याने घेत नाही. हनुमान जयंती आणि रामनवमी हे सण आम्ही तुमच्यापेक्षा मोठ्याप्रमाणात मुंबईत साजरे करतो. त्यामुळे भाजपने आम्हाला शिकवू नये. असेही संजय राऊत (Sanjay raut) यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा :- 

ED’s action on Sanjay Raut is right, says Maharashtra MP Navneet Rana

नागपूरात कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन

वाचा मौनस्य श्रेष्ठम्, अमोल मिटकरींचं ट्वीट

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close