28 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमुंबईशिवडी स्टेशन व्यवस्थपकाला 'मुंबई रत्न' पुरस्कार, राज्यपालांनी केला सत्कार

शिवडी स्टेशन व्यवस्थपकाला ‘मुंबई रत्न’ पुरस्कार, राज्यपालांनी केला सत्कार

टीम लय भारी-

मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावरील शिवडी स्टेशन व्यवस्थापकांचा राज्यपाल श्री. भगत सिंग कोश्यारी यांनी सत्कार केला. (Shivdi station manager been awarded for clean station)

किंग्ज सर्कल आणि शिवडी स्थानकाला अस्वच्छ स्थानकांच्या यादीतून स्वच्छ स्थानकांच्या यादीत आणलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शिवडी रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक नितेश कुमार सिन्हा यांना ‘मुंबई रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Nitesh kilumar sinha earned an award named ‘mumbai ratna’)

केंद्रीय मंत्री नारायण राणे झाले ट्रोल; या कारणामुळे नेटकऱ्यांनी घेतले फैलावर

Shivdi
शिवडी स्टेशन व्यवस्थपकाला ‘मुंबई रत्न’ पुरस्कार, राज्यपालांनी केला सत्कार

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त परळीत बॅनरबाजी, भाजपच्या नेत्यांचे फोटो मात्र गायब

अस्वछता, दुर्गंधी, बेरंगी भिंती असलेल्या शिवडी स्थानकातून नागरिकांना प्रवास करावा लागत होता. परंतु, व्यवस्थापक असलेल्या कुमार सिन्हा यांनी जिद्द आणि चिकाटीने मेहनत करून, शिवडी आणि कींग्ज सर्कल परिसराचे रुपडे पालटून टाकले.

स्थानकांच्या स्वच्छतेवर जास्त भर दिला, भिंती रंगवल्या, पाण्याची व्यवस्था, झाडे लावली त्या मुळे गुदमरल्या सारखे वाटणाऱ्या शिवडी स्थानकात नागरिक आता मोकळा श्वास घेत आहेत. अश्या प्रकारे खूप मेहनत घेऊन त्यांनी शिवडी आणि किंग्ज सर्कल स्थानकाला चकाकी दिली आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिसऱ्या दिवशी मेरी कोम आणि पी व्ही सिंधुकडून भारताला मोठ्या विजयाची आशा

https:mumbai/shivdi-railway-crossing-road-collapse-mumbai-see-photos-a681/

सिन्हा हे शिवडी स्थानक व्यवस्थापकाच्या आधी किंग्ज सर्कल स्थानकाचे व्यवस्थापक होते. त्या मुळे त्यांनी दोन्ही स्थानकांच्या स्वच्छतेचे कार्य हाती घेतले.

“राज्यपालांच्या हस्ते सत्कार झाल्यामुळे मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो. माझ्यासाठी आणि रेल्वेसाठी ही गौरवाची बाब आहे. प्रथमच राज भवनात स्थानक व्यवस्थापकाला राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले असेल, असे मला वाटते. मिळालेल्या या सन्मानामुळे माझी छाती भरून आली आहे, अन् काम करण्यचीत अधिक ऊर्जा माझ्या अंगात आली आहे.” असे सिन्हा म्हणाले.
या कार्यक्रमात उद्योग, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील 31 जणांचा सन्मान करण्यात आला. यांमध्ये उद्योगपती रतन टाटा, उद्योगपती अदि गोदरेज, पालिका आयुक्त इकबाल सिंह, विधितज्ञ उज्ज्वल निकम, पार्श्वगायक उदित नारायण, गायक अनुप जलोटा इ. सन्मान करण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी