27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeक्रीडाKapil Dev: मला डीप्रेशन सारखी अमेरीकन संकल्पना पटत नाही; कपिल देवचे ...

Kapil Dev: मला डीप्रेशन सारखी अमेरीकन संकल्पना पटत नाही; कपिल देवचे वादग्रस्त विधान

कपिल देवने आपल्या टिप्पणीत स्पष्टपणे सांगितले की, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळण्यासाठी खेळाडूंवर खूप दबाव असतो हे ते सतत ऐकत असतात आणि जर त्यांना असे वाटत असेल तर त्यांनी खेळू नये असे सरळ विधान केले. 'डिप्रेशन' सारख्या शब्द अमेरिकन संकल्पना आहेत आणि ते त्यांच्याशी सहमत नाही असा दावाही त्यांनी केला.

जगभरात विशेषत: भारतासारख्या क्रिकेटवेडया देशात खेळाडूंवर प्रंचड तणाव असतो. त्याबद्दल अनेकदा खेळाडू चर्चासुद्धा करत असतात. माजी भारतीय कपिल देव यांना सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळण्याच्या उच्च दबावाला सामोरे जाण्याबद्दल विचारले असता एक वादग्रस्त टिप्पणी केली आहे. कपिल देवने आपल्या टिप्पणीत स्पष्टपणे सांगितले की, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळण्यासाठी खेळाडूंवर खूप दबाव असतो हे ते सतत ऐकत असतात आणि जर त्यांना असे वाटत असेल तर त्यांनी खेळू नये असे सरळ विधान केले. ‘डिप्रेशन’ सारख्या शब्द अमेरिकन संकल्पना आहेत आणि ते त्यांच्याशी सहमत नाही असा दावाही त्यांनी केला.

एका कार्यक्रमात प्रेक्षकांना संबोधित करताना कपिल म्हणाला की, मी टीव्हीवर अनेकदा ऐकतो की आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंवर खूप दबाव असतो. तेव्हा मी फक्त त्यांना एकच सांगतो, खेळू नका. एखाद्या खेळाडूला आवड असेल, तर दबाव नसतो. मला नैराश्यासारखे अमेरिकन शब्द समजू शकत नाहीत. मी एक शेतकरी कुटुंबातून आलो आहे आणि आम्ही खेळतो कारण आम्ही खेळाचा आनंद घेतो. खेळाचा आनंद घेताना कोणतेही दडपण असू शकत नाही.

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स हा आणखी एक खेळाडू आहे जो त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल बोलला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडूने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या त्याच्या माहितीपटात म्हटले आहे की त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला क्रिकेटचा तिरस्कार वाटू लागला होता.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने देखील या मुद्द्यांवर खुलासा केला होता आणि उघड केले होते की, कोविड -19 साथीच्या रोगामुळे संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी खेळाडूंवर बायो-बबल निर्बंध लादण्यात‍ आले होते. त्यामुळे खेळाडूंना कठीण काळात खेळ सुरू ठेवण्यासाठी कठीण झाले होते.

 

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी