29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeक्रीडाउमेश यादवने मोडला मोठा विक्रम, IPL च्या इतिहासात असं करणारा ठरला पहिला...

उमेश यादवने मोडला मोठा विक्रम, IPL च्या इतिहासात असं करणारा ठरला पहिला गोलंदाज

IPL 2024 चा 17वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्समध्ये खेळण्यात आला. हा सामना पंजाब किंग्सने जिंकला. मात्र, या सामन्यादरम्यान गुजरातच्या वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. उमेश यादवने पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनला क्लीन बोल्ड केले. दोन चेंडूंवर केवळ एक धाव घेऊन धवन पॅव्हेलियनमध्ये परतला. (IPL 2024 Umesh Yadav broke another big record in IPL history)

IPL 2024 चा 17वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्समध्ये खेळण्यात आला. हा सामना पंजाब किंग्सने जिंकला. मात्र, या सामन्यादरम्यान गुजरातच्या वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. उमेश यादवने पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनला क्लीन बोल्ड केले. दोन चेंडूंवर केवळ एक धाव घेऊन धवन पॅव्हेलियनमध्ये परतला. (IPL 2024 Umesh Yadav broke another big record in IPL history)

IPL 2024: पंजाब किंग्सने शशांक सिंगला चुकून घेतले होते विकत, जाणून घ्या काय झालं होता?

शिखर धवनला बाद केल्यानंतर उमेशने आयपीएलमध्ये आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे.उमेश यादवने पंजाब किंग्सविरुद्ध 34 विकेट घेतली आणि आता तो आयपीएलच्या इतिहासात एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने या प्रकरणात ड्वेन ब्राव्हो आणि मोहित शर्माला मागे टाकले आहे. (IPL 2024 Umesh Yadav broke another big record in IPL history)

उमेश यादवपूर्वी ब्राव्हो आणि मोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध 33-33विकेट घेतल्या होत्या. तर सुनील नारायण या यादीत चौथ्या स्थानावर आहे, ज्यांच्या नावावर पंजाब किंग्जविरुद्ध 33 विकेट आहेत. केकेआर विरुद्ध भुवनेश्वर कुमारच्या नावावर 32 विकेट आहेत. (IPL 2024 Umesh Yadav broke another big record in IPL history)

IPL 2024: रवी शास्त्रीने केला विराट कोहलीबाबत मोठा दावा, चाहत्यांमध्ये उडाली खळबळ

तुम्हाला सांगते की, नागपूरच्या उमेश यादवला यंदा आयपीएल लिलावात गुजरात टायटन्सने 5.80 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन विकेट घेतल्या होत्या. या हंगामात त्याच्या नावावर आतापर्यंत चार विकेट्स आहेत. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, आरसीबीकडूनही खेळला आहे. आयपीएलमध्ये उमेशने 145 सामन्यांमध्ये 140 विकेट्स घेतल्या आहेत. (IPL 2024 Umesh Yadav broke another big record in IPL history)

IPL 2024: सलग तीन सामने हरल्यानांतर फ्रेंचायझीने दिली MI च्या खेळाडूंना ‘अशी’ शिक्षा

सामन्याबाबत बोलणं झाला तर गुजरात टायटन्स ने पहिले फलंदाजी करत 199 धावा केल्या. याचा पाठलाग करत पंजाब किंग्सने 7 गडी गमावून लक्ष पूर्ण केला. या सामन्याचा हिरो शशांक सिंग ठरला. शशांकने धडाकेबाज खेळी खेळत 29 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या आणि आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. (IPL 2024 Umesh Yadav broke another big record in IPL history)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी