27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाIPL 2024: रवी शास्त्रीने केला विराट कोहलीबाबत मोठा दावा, चाहत्यांमध्ये उडाली खळबळ 

IPL 2024: रवी शास्त्रीने केला विराट कोहलीबाबत मोठा दावा, चाहत्यांमध्ये उडाली खळबळ 

IPL 2024 मध्ये दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यानुसार गुणतालिकेत सुद्धा बदल दिसत आहे. मात्र, यंदाच्या हंगामात देखील रॉयल चॅलेंजर्सची परिस्थिती तशीच आहे जशी मागील हंगामात होती. विराट कोहली आणि आरसीबीचे करोडो चाहतेआहे, जे आपल्या आवडत्या संघाला एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकताना पाहण्यासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. (IPL 2024 Ravi Shastri makes big claim about Virat Kohli) पण बंगळुरू आतापर्यंत आपल्या चाहत्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे.

आयपीएल 2024 मध्येही आरसीबीला पहिल्या 4 पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. अशा परिस्थितीत चाहते पुन्हा निराश झाले आहेत. याचदरम्यान माजी भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांनी विराट कोहलीबाबत मोठा दावा केला आहे. यामुळे कोहलीच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. (IPL 2024 Ravi Shastri makes big claim about Virat Kohli)

IPL 2024: पंजाब किंग्सने शशांक सिंगला चुकून घेतले होते विकत, जाणून घ्या काय झालं होता?

आरसीबी संघाबाबत चर्चा करताना रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सवर हे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की कोहलीला त्याच्या संघाचा पाठिंबा मिळत नसल्याने आरसीबीला आजपर्यंत ट्रॉफी जिंकता आलेली नाही. वैयक्तिक खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे आयपीएल ट्रॉफी दिली असती तर आज विराट कोहलीने सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकली असती. यावरून शास्त्रींनी कोहलीचे भरपूर कौतुक केल्याचे स्पष्ट झाले आहे. संघातील मोजकेच खेळाडू चांगली कामगिरी करू शकल्याने कोहलीला आजपर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. कोहलीची कामगिरी नेहमीच चांगली असते, मात्र संघात इतर खेळाडू नसल्यामुळे आरसीबीची विजयाची प्रतीक्षा लांबत चालली आहे. (IPL 2024 Ravi Shastri makes big claim about Virat Kohli)

IPL 2024: सलग तीन सामने हरल्यानांतर फ्रेंचायझीने दिली MI च्या खेळाडूंना ‘अशी’ शिक्षा

तुम्हाला सांगते की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2008 पासून आयपीएल खेळले जात आहे. विराट कोहलीही 2008 पासून आरसीबीशी जोडला गेला आहे. आयपीएल 2024 हा या स्पर्धेचा 17वा हंगाम आहे. याआधी आयपीएलचे 16 हंगाम खेळले गेले आहेत, परंतु बेंगळुरूला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे, आरसीबी महिला क्रिकेट संघाने WPL 2024 मध्ये विजयाचे खाते उघडले आहे.  स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकली आहे, परंतु आयपीएल ट्रॉफी अद्याप आरसीबीने अस्पर्शित केली आहे. (IPL 2024 Ravi Shastri makes big claim about Virat Kohli)

IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवला इशांत शर्माने दिला सल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी