25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरक्रीडाभारताविरुद्ध पराभवामुळे क्रिकेट बोर्ड हटवला, मग कोर्टाने बरखास्त केला निर्णय...

भारताविरुद्ध पराभवामुळे क्रिकेट बोर्ड हटवला, मग कोर्टाने बरखास्त केला निर्णय…

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुरुवार, 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या वन डे वर्ल्ड कप मधील सामन्यात भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकन फलंदाजीचे कंबरडे मोडून अवघ्या 55 धावांमध्ये डाव संपवला होता. या मानहानिकारक पराभवानंतर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी कडक कारवाई करत सोमवारी संपूर्ण क्रिकेट बोर्डला बरखास्त केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा हा निर्णय मागे घ्यावा लागणार आहे. श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी एक मोठा निर्णय घेत संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या पदाधिकाऱ्यांना पदावरून बरखास्त केले होते. त्याविरोधात, बोर्डाचे अध्यक्ष शमी सिल्वा यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने सिल्वा यांची याचिका स्वीकारत क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी दिलेला निर्णय बरखास्त केला आहे.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शमी सिल्वा यांनी क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर कोर्टात धाव घेतली. कोर्टाने त्यांची याचिका स्वीकारून क्रीडामंत्र्यांनी घेतलेला निर्णय बरखास्त केला आहे. तसेच पूर्ण सुनावणी होईपर्यंत निष्काषीत केलेल्या अधिकाऱ्याना पुन्हा पदे बहाल केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डाला दोन आठवड्यांसाठी संमती देण्यात आली असून त्यानंतर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे.


कोर्टाने इतक्यावरच न थांबता माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखालील समितीलाही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीला सिल्वा यांना रोखण्याचे आदेश मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि क्रीडामंत्री यांच्यात वाद चालू आहेत. क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तसेच चौकशीसाठी अंतरिम समितीही नेमली होती.सात सदस्यीय समितीमध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश तसेच बोर्डाचे नाजी अध्यक्ष यांचा समावेश होता.

हे ही वाचा 

एंजेलो मॅथ्यूज झाला ‘टाइम आउट’, आता मॅचनंतरही होणार कारवाई

विराट कोहलीचे मी अभिनंदन का करायचे? ‘या’ संघाच्या कर्णधाराचा पत्रकारांना उलट सवाल

हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून ‘आउट’, ‘हा’ खेळाडू ‘इन’

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात गुरुवार, 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या वन डे वर्ल्ड कप मधील सामन्यात भारताने श्रीलंकेचा मानहानिकारक पराभव केला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथाम फलंदाजी करताना भारताने शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीमुळे 50 षटकांत 357 धावा चोपून काढल्या होत्या. त्यानंतर, 358 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला हे आव्हान आजिबात पेलवले नाही. भारतीय जलदगती गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 55 धावांत माघारी परतला. मोहम्मद शमीच्या 5 विकेट्स आणि मोहम्मद सिराजच्या 3 विकेट्सच्या जोरावर भारताने हा सामना एकहाती जिंकला होता. यावेळी, मोहम्मद शमी याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी