29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयअजित पवारांची सगळ्या खात्यांना तंबी, ऊसतोड कामगारांची काळजी घ्या

अजित पवारांची सगळ्या खात्यांना तंबी, ऊसतोड कामगारांची काळजी घ्या

टीम लय भारी

मुंबई :  ऊस तोडणीसाठी कारखान्यात काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांना सामाजिक सुरक्षितता देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. त्याचबरोबर ऊस तोड कामगारांच्या पाल्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करावी अशी ही सूचना पवारांनी दिल्या (Ajit Pawar held a meeting for sugarcane workers).

राज्यातील स्थलांतरित ऊस तोडणी कामगार, मुकादम, आणि वाहतूक कामगारांची नोंदणी करावी व त्यांना ओळखपत्र देण्यात यावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यात सुमारे १०१ सहकारी आणि ८७ खासगी साखर कारखाने असल्याची माहिती पवार यांनी दिली.

Ajit Pawar : अजित पवारांची मोठी घोषणा ! पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार

Ajit Pawar : BMC मध्ये महाविकास एकत्र लढणार ? की…, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Ajit Pawar : जिल्हा नियोजन विकास निधीत कपात नाही 

Maharashtra lockdown latest news: Deputy CM Ajit Pawar makes BIG statement over COVID-19 third wave

या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळणे आवश्यक आहे. स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या संबंधित विभागांनीया समन्वयाने काम करावे, स्थलांतरीत ऊस तोडणी मजूरांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा असून राज्यातील ज्या भागांतून अधिक ऊस तोडणी मजूर स्थलांतरीत करतात, त्या ठिकाणी वसतिगृहाची उभारणी करण्यात यावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी