33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeसिनेमापोलिसांची 'लालबत्ती' झी टॉकीजवर

पोलिसांची ‘लालबत्ती’ झी टॉकीजवर

टीम लय भारी

मुंबई : ‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरेल असे कार्य करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा सदैव करीत असते. एकाच वेळी वेगवेगळ्या असंख्य आघाडय़ांवर लढ़णाऱ्या पोलिसांच्या शौर्य, वीरता आणि संवेदनशीलतेचा अनुभव  देणाऱ्या, केवळ शासकीय यंत्रणेचा भाग न समजता पोलिसांकड़े एका वेगळया दृष्टीने पहाण्याचा विचार करायला लावणारा ‘लालबत्ती’ या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर येत्या रविवारी म्हणजे १९ सप्टेंबरला दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० वा. झी टॉकीजवर होणार आहे (Lalbatti premieres on Zee Talkies on September 19).   

राज्यातील 495 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या (API) बदलीं रद्द

रजनीकांतच्या चाहत्यांचा फाजीलपणा, पोस्टरवर शिंपडले रक्त

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पोलिस यंत्रणेच्या सबलीकरणासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ची (क्यूआरटी) स्थापना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केली आहे. दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये चिघळलेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी स्थापन केलेल्या ‘क्यूआरटी’ च्या कमांडोची ट्रेनिंग अतिशय कठीण असते. याच खडतर ट्रेनिंगचा थरार दाखवत आणि दहशतवादाशी मुकाबला करत, ज्येष्ठ पोलिस अधिकारी एस.बी.पवार आणि त्यांच्या हाताखाली क्यूआरटी टीममध्ये कार्यरत असणारा कमांडो गणेश, यांच्या नातेसंबधाभोवती ‘लालबत्ती’ चित्रपटाची कथा फिरते. केवळ शासकीय यंत्रणेचा भाग न समजता पोलिसांकड़े एका वेगळया दृष्टीने पहाण्याचा विचार ‘लालबत्ती’ चित्रपट नक्की देतो (Lalbatti definitely gives the idea of ​​looking at the police from a different perspective, not just part of the government system).

Lalbatti premieres on Zee Talkies on September 19
लालबत्ती चित्रपट 19 सप्टेंबर रोजी झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीला

Police : ‘पोलिसांचे पगार 6 महिन्यांसाठी दुप्पट करा’

Nushrratt Bharuccha’s horror film Chhorii to premiere on Amazon Prime Video in November 2021

‘साई सिनेमा’ या चित्रपट निर्मिती संस्थेची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे. ‘लालबत्ती’ या चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. रविवारी १९ सप्टेंबरला दुपारी १२.०० वा. व सायं ६.०० वाजता झी टॉकीजवर होणारा हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर नक्की पहा (Lalbatti stars Mangesh Desai, Bhargavi Chiramule, Tejas, Ramesh Vani, Meera Joshi, Anil Gavas and Manoj Joshi).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी