28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीयअखिलेश यादव यांचा विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय; म्हणाले…

अखिलेश यादव यांचा विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय; म्हणाले…

टीम लय भारी

नवी दिल्ली: सर्वच राजकीय पक्षांकडून उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे (Akhilesh Yadav’s decision not to contest Assembly elections).

उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये निवडणुका होणार आहेत. सध्या अखिलेश यादव हे आझमगडमधून सपाचे खासदार आहेत. एकेकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले अखिलेश यादव यांना समाजवादी पार्टीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा मानलं जात होतं, परंतु आपण निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील; असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

Kill Chori | श्रद्धा कपूर आणि भुवन बामच्या जोडीची कमाल, ‘किल छोरी’ गाण्याची युट्युबवर धमाल

अखिलेश यादव म्हणाले की, “समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) यांची राज्यातील निवडणुकासाठी युती झाली आहे. आरएलडीसोबत आमची युती ठरली असून लवकरच जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल.” तसेच निवडणुकीत काका शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पार्टी लोहियाला (पीएसपीएल) सोबत घेण्याच्या शक्यतेवर ते म्हणाले, “मला त्यांच्यासोबत युती करण्यात कोणतीही अडचण नाही. त्यांना आणि त्यांच्या पक्षातील लोकांना योग्य आदर दिला जाईल.”

धक्कादायक: दोन सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात जागीच मृत्यू

Won’t Contest UP Election Next Year, Says Akhilesh Yadav

दरम्यान, “२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील सर्व स्तरातील लोकांनी आपल्या पक्षाला राज्यात सत्तेवर आणण्याचा निर्णय घेतला आहे,” असा दावा अखिलेश यादव यांनी रविवारी केला. तसेच सपा सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेश पुन्हा समृद्धीच्या मार्गावर येईल, असं हरदोई येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी