29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयइतर राज्यांची राख आणि गुजरातमध्ये रांगोळी ! आदित्य ठाकरे

इतर राज्यांची राख आणि गुजरातमध्ये रांगोळी ! आदित्य ठाकरे

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार, मा. श्री. आमदार आदित्यजी ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांची मावळ लोकसभा मतदारसंघाचे मविआ उमेदवार संजोग वाघेरेंच्या प्रचारार्थ मावळच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ सभा संपन्न झाली . या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार सचिन अहिर, रोहित पवार, संजय जगताप, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील , आणि इतर नेते उपस्थित होते . यावेळी 'आज प्रत्येकाला बदल हवाय. हा बदल महाविकास आघाडीचे 'मिलीजुली' सरकारच आणू शकते, असा विश्वास जनतेला आदित्य ठाकरेंनी दिला .

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार, मा. श्री. आमदार आदित्यजी ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांची मावळ लोकसभा मतदारसंघाचे मविआ उमेदवार संजोग वाघेरेंच्या प्रचारार्थ मावळच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ सभा संपन्न झाली . या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार सचिन अहिर, रोहित पवार, संजय जगताप, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील , आणि इतर नेते उपस्थित होते . यावेळी ‘आज प्रत्येकाला बदल हवाय. हा बदल महाविकास आघाडीचे ‘मिलीजुली’ सरकारच आणू शकते, असा विश्वास जनतेला आदित्य ठाकरेंनी दिला .(Ash from other states and rangoli in Gujarat! Aaditya Thackeray)

तसचं ‘संजोग वाघेरे अर्ज भरायला गेले आहेत . मी त्यांना कानात सांगितलं, तुम्ही फक्त अर्ज भरा . अर्ज भरताना त्यात चूक होऊ देऊ नका . जनतेने ही ठरवलं आहे, कोणती चूक व्हायला द्यायची नाही’. असं आदित्य ठाकरे म्हणाले, त्याच बरोबर ‘अब की बार 400 पार हे भाजप म्हणत. पण आम्ही दिल्लीत जाऊन काय म्हटलं, अब की बार . त्यावर समोरून जनेतेतून आवाज आला ‘तडीपार’, गेल्या दोन वर्षात अवकाळी झाली, तेव्हा सरकार शेतकऱ्याच्या बांधावर आलं का ? आदित्य ठाकरेंचा जनतेला सवाल उपस्थित जनतेला संबोधित करताना ‘गेली दोन वर्षे अवकाळी पाऊस, दुष्काळ झालं . त्यावेळी एकतरी गद्दार मंत्री शेताच्या बांधावर आला का ? मदत मिळाली का ? मी खोटं बोलतोय का ? त्यामुळं साध्याच केंद्रातील आणि राज्यातील सरकार पुढची पाच वर्षे परवडणार आहे का ? शेतकरी दिल्लीकडे आंदोलन घेऊन निघाले तेंव्हा भाजप सरकारने लाठ्या चालवल्या, गोळीबार केला, अशा भाजपला तुम्ही मतदान करणार का ? असा सवाल जनतेला आदित्य ठाकरेंनी केला .

सरकार बेभरोसे !
सरकारच्या अनागोंदी कारभारावर बोलता आदित्य ठाकरे म्हणाले की ‘महिला आपल्या पाठीशी आहेत . उद्धव ठाकरेंवर या महिलांना खूप विश्वास आहे . मात्र तुम्ही सांगा आत्ताच्या सरकारमध्ये तुम्हाला सुरक्षित वाटतं का ? महिलांवर अन्याय करणाऱ्या नेत्यांना पद देतात . गुंड नेत्यांसोबत फिरतात, मंत्रालयात येऊन रिल्स करतात . बिलकीस बानोवर भयानक बलात्कात झाला . त्यातील आरोपींना प्रचारावेळी गुजरात सरकारने बाहेर काढलं . आज ते प्रचार करतात . मुळात बलात्कार करणाऱ्यांना फाशी व्हायला, मात्र इथं काय घडतंय ? असे खडे बोल सुनावले .

इतर राज्यांची राख आणि गुजरातमध्ये रांगोळी !
राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले जातायत . बेरोजगारी राज्यात वाढलेली आहे, यावर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले ‘युवा वर्गाने सांगावं ,गेली पाच वर्षे तुम्ही पाहिलीत , कोरोनात उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आणि सरकारने कसं कार्य केलं, हे प्रकर्षाने दिसत होतं . पण या सरकारने इथले प्रकल्प घालवले . वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प जाऊ नये म्हणून मी स्वतः आंदोलन केले . तो प्रकल्प इथं झाला असता तर आपल्याला नोकऱ्या मिळाल्या असत्या . प्रकल्प, वर्ल्डकप मॅच हे सगळं गुजरातला पळवले . ठराविक राज्याचा विकास, इतर राज्यांची राख आणि गुजरातमध्ये रांगोळी . अशी राखरांगोळी या सरकारने केली’, असं आदित्य ठाकरे म्हणाले .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी