34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयमंत्री अशोक चव्हाणांना पाच बहिणींकडून आल्या राख्या, त्या मुलींकडून बांधल्या

मंत्री अशोक चव्हाणांना पाच बहिणींकडून आल्या राख्या, त्या मुलींकडून बांधल्या

टीम लय भारी

मुंबई : रविवारी (22 ऑगस्ट) पार पडलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त  अनेक नेत्यांनी आणि अभिनेत्र्यांनी आपल्या बहिणींना राखी बांधत रक्षाबंधन साजरी केली. राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांना देखील त्यांच्या पाच बहिणींकडून राख्या आल्या होत्या. या राख्या त्यांनी आपल्या दोन मुलींकडून बांधून घेतल्या आहेत (Ashok Chavan received five sisters rakhya).

सध्या राज्यात कोरोणाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या पाचही बहिणी राखी बांधण्यासाठी त्यांच्या घरी आल्या नव्हत्या. चव्हाण यांनी या राख्या मुलगी श्रिजया आणि सुजया यांच्याकडून बांधून घेतल्या.

Ashok Chavan : आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधानांनी कष्टकऱ्यांना 7500 रूपये द्यावेत

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

Ashok Chavan received five sisters rakhya
अशोक चव्हाण यांनी बहिणींकडून आलेल्या राख्या मुलींकडून बांधून घेतल्या

आपल्या पाच बहिणींनी पाठवलेल्या  राखी पाहून अशोक चव्हाण थोडे भावूक झाले होते. दरवर्षी मी जिथे कुठे असायचो तिथे माझ्या बहिणी मला राखी बांधण्यासाठी यायच्या परंतु कोरोनामुळे त्या या वर्षी येऊ शकल्या नाहीत असे चव्हाण सांगतात. तसेच या राख्यांसोबत आपल्या बहिणींनी आपल्याला आशिर्वादाचे आणि प्रेमाचे दोन शब्द पत्रात लिहून पाठवले आहेत असे ही अशोक चव्हाण सांगतात.

अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीय खासदारांना लिहिले पत्र

Centre Lost Golden Opportunity To Facilitate Maratha Reservation: Ashok Chavan

अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हे रक्षाबंधन सर्वांना आनंदाचे आणि  सुखाचे जावो अशा सदिच्छा ही त्यांनी दिल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी