31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजबाजीराव पेशव्यांच्या समाधीस्थळी भव्य स्मारक उभे राहणार, मध्य सरकारची योजना

बाजीराव पेशव्यांच्या समाधीस्थळी भव्य स्मारक उभे राहणार, मध्य सरकारची योजना

टीम लय भारी

माळवा : माळव्यातील रावेरखेडीमध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थळावर त्यांचा ३२१ वा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. मध्यप्रदेश राज्य सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने पेशवे समाधी आणि जिर्णोद्धार प्रकल्पाचे भूमीपूजन झाले (Bajirao Peshwe 321st birth anniversary celebration was held at the tomb of the wealthy elder at Raverkhedi in Malwa).

या सोहळ्यात मुख्यमंत्री शिवराज चौहान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर, कृषी मंत्री कमल पटेल, खासदार गजेंद्र चौहान, बाजीराव मस्तानीचे वंशज अवेश बहाद्दुर, बाजीराव स्मारक समितीचे सचिव श्रीपाद कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी,  ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, होळकर घराण्याचे वंशज यशवंतराव होळकर, इत्यादी दिग्गज उपस्थित होते (Veterans were present at the 321st Jayanti celebrations at the tomb of Bajirao Peshwa).

सुभेदार मल्हारराव होळकरांचे ऐकले असते तर पानिपत जिंकले असते

‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’ने अखेर रूग्णालय सरकारकडे सोपविले, पण अवघ्या 30 खाटांचे

माळव्यातील रावेरखेडीमध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थळावर ३२१ वा जयंती सोहळा साजरा करण्यात आला.
माळव्यातील रावेरखेडीमध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थळावर ३२१ वा जयंती सोहळा साजरा करण्यात आला.

थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी मध्यप्रदेश राज्यसरकारने 100 कोटी रुपयांची योजना आखली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री चौहान यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर बाजीरावांचा भव्य पुतळा, संग्रहालय, शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजाची प्रतिकृती, शिवमंदीराचा जिर्णोद्धार, पर्यटक निवास इत्त्यादी या योजनेच्या अंतर्गत साकारण्यात येणार आहे.

थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी मध्यप्रदेश राज्यसरकारने 100 कोटी रुपयांची योजना आखली आहे.
थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी मध्यप्रदेश राज्यसरकारने 100 कोटी रुपयांची योजना आखली आहे.

महाराज छत्रसाल बुंदेले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत मुघलांशी संघर्ष करत राज्य स्थापन केले. ते स्वराज्य मुघल सेनापती मोहंमद खान बंगशाने जिंकले. तेव्हा छत्रसालांच्या विनंतीहून बाजीरावांनी मराठे, बुंदेले, रजपूत, आणि जाट यांची एकजूट करत, मुघलांच्या तावडीतून राज्य मुक्त केले. त्यामुळे बाजीरावांचे ऋण माळवा-बुंदेलखंडची जनता कधीही विसरणार नाही, असे वक्तव्य मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले.

लोकमान्य टिळकांनी मुस्लीमांना वेगळे मतदारसंघ दिले, पंडित नेहरूंनी ते काढून घेतले; गांधींनी मुस्लिमांचे फाजिल लाड केले नाहीत

Sutradhara’s Tales: Nanasaheb Peshwa kick-starts Pune’s development with the Parvati temple complex – Hindustan Times

बाजीरावांनी अठरापगड जातीतील कर्तृत्ववान तरुणांना सोबत घेऊन, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात साम्राज्य केले. त्यामुळेच होळकर, शिंदे, पवार, गायकवाड ही घराणे उदयाला आली, असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

‘‘सह्याद्रीतील गणिमीकावा माळवा-बुंदेलखंडाच्या मैदानी प्रदेशात सोईचा नाही. म्हणून बाजीरावाने घोडदळाचा गणिमीकावा विकसित केला. बाजीरावांनी माळवा बुंदेलखंडात साम्राज्य वाढविले आणि मराठी साम्राज्याचा पाया रचला.’’ असे ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी