34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयआश्रमशाळेत २८२ शिक्षक पदभरती

आश्रमशाळेत २८२ शिक्षक पदभरती

राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण ९७७ आश्रमशाळा चालविण्यात येतात. यावर्षी 225 कोटी रुपये तरतुदींपैकी १८० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहीती समोर येत आहे. आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. अशातच आता २ लाख २३ हजार विद्यार्थी संख्या असून यासाठी आश्रमशाळेत शिक्षकांच्या २८२ पदे भरण्यात येत आहे. यासाठी मत्रीमंडळाने हिरवा कंदील दाखवला असल्याचं मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावेंनी विधानसभेत सांगितलं आहे.

कॉंग्रस नेते विजय वडेट्टीवार यांनी आश्रमातील शिक्षकभरती करण्याबाबत विचारले असता, सावेंनी शिक्षकभरती करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी थेट लाभ देण्यात येणार असल्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

हे ही वाचा

नवाब मलिकांची कोंडी; सुनिल तटकरेंचा मलिकांबाबत गौप्यस्फोट

शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य वस्तूंची विक्री बंद?

अजित पवारांचा सिंचन घोटाळा; फडणवीसांच्या पत्रावर राऊत आक्रमक

यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ६०० विद्यार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे. परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून आता ७५ करण्यात येणार आहे. याबाबत कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत चर्चेत सहभाग नोंदवला आहे. मागास व बहुजन कल्याणविभागातर्फे १४१ कला आणि विज्ञान तर ७ कला आणि वाणिज्य अशा १४८ उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत. उच्चस्तरीय सचिव समितीने गणित आणि विज्ञान विषयांकरिता मान्यता दिली जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी