31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeराजकीयशाळेच्या परिसरात तंबाखूजन्य वस्तूंची विक्री बंद?

शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य वस्तूंची विक्री बंद?

राज्यात शाळेच्या बाहेर अनेकदा टपऱ्या पाहायला मिळतात. आतापर्यंत या टपऱ्यांमध्ये शाळकरी लहान मुलं गोळ्य बिस्कीटांची खरेदी करायचे. मात्र आता शाळेच्या बाहेर लावण्यात आलेल्या टपऱ्यांमध्ये तंबाखूजन्य वस्तू विक्रीसाठी असतात. हे तंबाखूजन्य वस्तू शाळकरी मुलं विक्री करत असून त्याचे सेवन करतात, असे निदर्शनास आले आहे. गुटखा बंदीचा विषय मिटता मिटता आता तंबाखूजन्य वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्याबाबत सरकार आपल्या पातळीवर काम करत आहे. यावर आता मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तंबाखूजन्य वस्तूंवर काही भूमिका घेतल्या आहेत. आत्राम यांनी याबाबतची माहीती दिली आहे.

आत्राम यांची तंबाखूजन्य वस्तूंविरोधात भूमिका

शाळकरी मुलांना व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण, २०२० राबवण्यात येत आहे. गुटखा, पान तसेच, अन्न आणि औषध प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा, मानके कायदा, २००६ अंतर्गत दि.१८ जुलै २०२३ रोजीच्या अधिसूचनेन्वये राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आणि तत्सम पदार्थास उत्पादन, विक्री, वितरण, साठा, वाहतूकीसाठी प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.

हे ही वाचा

नवाब मलिकांची कोंडी; सुनिल तटकरेंचा मलिकांबाबत गौप्यस्फोट

अजित पवारांचा सिंचन घोटाळा; फडणवीसांच्या पत्रावर राऊत आक्रमक

आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ; दिशा सालियन प्रकरणी होणार चौकशी

अन्न व औषध प्रशासनाने ०१ एप्रिल २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एकूण ६७६ ठिकाणी कारवाई केली. याद्वारे ४७० गुन्हे पोलिसांत नोंदवण्यात आले आणि ९५ वाहने जप्त करण्यात आली. एकूण रुपये १७ कोटी ६४ लाख ७६ हजार ६७४ किंमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे व ७०९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कलम ४ अंतर्गत ०१ एप्रिल २०२३ ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २१३ प्रकरणी कारवाई करून ४४,९९९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कलम ६ अन्वये एकूण ९ प्रकरणी कारवाई करून १८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कलम ७ अन्वये एका प्रकरणी २३१० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती लेखी उत्तरात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी