33 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांचा सिंचन घोटाळा; फडणवीसांच्या पत्रावर राऊत आक्रमक

अजित पवारांचा सिंचन घोटाळा; फडणवीसांच्या पत्रावर राऊत आक्रमक

राज्यात आगामी निवडणुकांमुळे आता राज्यातील राजकीय वातावरण पेटू लागलं आहे. यामुळे आता सर्वच विरोधक सत्ताधारी पक्षांवर आणि सत्ताधारी विरोधकांवर टीका टीप्पणी करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर राज्यातील राजकारण हे वेगळ्याच वळणावर गेले असून राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवार गटातील अनेक नेते ईडीच्या धाकाने भाजपशी हातमिळवणी केली असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच हिवाळी अधिवेशन सुरू झालं असून पहिल्याच हिवाळी अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे नवाब मलिक अजित पवार गटात गेले आहेत. यावरून हे वातावरण तापलं आहे. मलिक अजित पवार गटात गेल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र समाज माध्यमावर शेअर केलं आहे. यावर त्यांनी सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असे पत्रात नमूद केलं आहे, यावर आता शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटातील नेत्यांची आणि भाजपची खरडपट्टी काढली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

फडणवीसांनी शेअर केलेल्या पत्राला ‘सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा’ असे कॅप्शन दिलं आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी अशी माहिती देवेंद्रजींनी दिली आहे. महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला हे माहित नाही, असे म्हणत संजय राऊतांनी हल्ला केला आहे. यानंतर त्यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळा फेम असे डिवचले आहे. त्यांच्या देशात हसन मुश्रिफ प्रफुल्ल पटेल, ईडी फेम भावना गवळी, सरनाईक आणि किरीट सोमय्यांचे नाव न घेता नागडा पोपटलाल असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर आणि भाजपवर हल्ला केला आहे.

हे ही वाचा

आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ; दिशा सालियन प्रकरणी होणार चौकशी

नवाब मलिक कोणत्या गटात?

शिर्डीतील निर्मळ पिंपरीत दलित कुटुंबाला मारहाण

त्यानंतर राऊत म्हणाले की, यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर आणि बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी.. जात मांजराची.. असा पलटवार करत संजय राऊतांनी अजित पवार गट आणि देवेंद्र फडणवीसांची खरडपट्टी काढली.

काय होतं पत्रात?

नवाब मलिक हे अजित पवार गटात (७ डिसेंबर) दिवशी आले आणि याच दिवशी फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं आहे.  नवाब मलिक यांच्यावर देशद्रोही असा आरोप लावण्यात आला असून मलिक हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित होते. आमची आणि त्यांची वैयक्तिक शत्रूता अजिबात नाही, मात्र अजूनही त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नसल्यास आपण जरूर त्यांचे स्वागत करावे. सध्या वैद्यकीय जामीनावर बाहेर आले आहेत. यामुळे आम्ही त्यांची सहमती दाखवू शकत नाही. सत्ता येते आणि जाते मात्र सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. त्यांच्यावर काही आरोप असल्याने ते महायुतीचा भाग होऊ शकत नाहीत. आपला पक्ष आहे कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. मात्र महायुतीत बाधा येऊ नये याचा विचार घटक पक्षाला करावा लागेल.  हे स्पष्ट करतो, असे फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी