25 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीयमहुआ मोईत्रांची खासदारकी रद्द

महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द

देशातील राजकारणात दररोज काहीना काही ट्विस्ट घडत आहेत. एका बाजूला राज्यात आदित्य ठाकरेंच्या दिशा सालियन प्रकणावरून चौकशी होण्याबाबत चर्चा आहे. तर दुसरीकडे देशात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा वाद गेली अनेक दिवसांपासून सुरू होता. यामुळे आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोकेदुखीत अधिक वाढ झाली आहे. संसदेच्या एथिक्स पॅनेलने संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या आरोपात दोषी ठरवलं आहे. यामुळे मोईत्रा यांना लोकसभा अध्यक्षांनी खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली असल्याने त्यांना खासदारकी पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी महुआ मोईत्रा संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारण्याबाबत चांगल्याच वादात सापडल्या होत्या. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी मोईत्रांवर पैसे देऊन प्रश्न विचारत असल्याचा दावा केला आहे. यामुळे आता नेमलेल्या एथिक्स कमिटीनं हा अहवाल स्विकारुन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, कारवाईनंतर मला संसदेत याप्रकरणी बोलून दिलं नाही असा आरोप महुआ मोईत्रा यांनी केला आहे.

हे ही वाचा

नवाब मलिकांची कोंडी; सुनिल तटकरेंचा मलिकांबाबत गौप्यस्फोट

अजित पवारांचा सिंचन घोटाळा; फडणवीसांच्या पत्रावर राऊत आक्रमक

शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य वस्तूंची विक्री बंद?

निशिकांत दुबेंचा मोईत्रांवर आरोप

निशिकांत दुबेंनी महुआ मोईत्रांबाबत गंभीर आरोप केले आहेत. मोईत्रा या मुंबईतील एका व्यवसायिकाच्या सांगण्यावरून संसदेत प्रश्न विचारत आहेत. याबदल्यात त्यांना पैसे, महागड्या भेट वस्तू देण्याचा आरोप दुबेंनी केला आहे. या प्रकरणाबाबत लोकसभाध्यक्षांकडे चौकशी करण्याबाबत मागणी दुबे यांनी केली आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतरही महुआ मोईत्रा यांनी माध्यमांशी बोलताना लोकसभेचं सदस्यत्त्व रद्द करण्याबाबत सांगितलं आहे.

 खासदाकरी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा काय म्हणाल्या?

खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी सांगितलं की, मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे माझं लोकसभेचं सदस्यत्त्व रद्द झालं आहे. एथिक्स कमिटीसमोर माझ्याविरूद्ध कोणताही मुद्दा नव्हता. कोणताही माझ्याविरूद्ध पुरावा नव्हता. फक्त आदानींचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने माझं सदस्यत्त्व काढून घेण्यात आलं असं मोईत्रा म्हणाल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी