30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
HomeराजकीयEknath Khadse : मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिले : एकनाथ खडसे

Eknath Khadse : मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिले : एकनाथ खडसे

टीम लय भारी

मुक्ताईनगर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेले आणि त्यामुळे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्य़ेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर जहरी टीका केली. एका जाहीर कार्यक्रमात दोघांमधील वादाचे कथन करताना ‘मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिले,’ असे विधान खडसे यांनी केले आहे. मुक्ताईनगर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

उपस्थितांसमोर बोलताना खडसे म्हणाले, “नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितले गेले नाथाभाऊ तू आता घरी बैस मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटले, घे रे तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

आपण भाजपा का सोडली याच कारण सांगताना खडसे म्हणाले, “भाजपाने एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केले. एका व्यक्तीमुळे सरकारचे वाटोळे झाले. या अशा लोकांमुळे मला भाजपा सोडावी लागली. जिथे आपलेच गद्दार होतात त्या घरात राहून काय उपयोग आहे. यांच्यापेक्षा दिलदार शत्रू बरा. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.”

“मी अख्खे आयुष्य भारतीय जनता पक्षाला दिले. माझा मुलगा गेला तरीही मी भाजपाशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छळले” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी