26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
HomeराजकीयCorruption : भाजपाचे शिवसेनेला आव्हान : राज्यात तुमची सत्ता आहे ना, मग...

Corruption : भाजपाचे शिवसेनेला आव्हान : राज्यात तुमची सत्ता आहे ना, मग भ्रष्टाचार कोणी केला याची चौकशी लावाच

टीम लय भारी

मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचे केवळ आरोपच शिवसेना करत असून त्यांना एकही भ्रष्टाचार सिद्ध करता आलेला नाही. राज्यात तुमची सत्ता आहे ना, मग कोणी भ्रष्टाचार केला याची लावा चौकशी, असे थेट आव्हानच भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी शिवसेनेला दिले आहे. (BJP’s challenge to Shiv Sena: Do you have power in the state, then inquire who committed corruption)

आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आमदार प्रताप सरनाईक व आ. गीता यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी आ. सरनाईक यांनी पालिकेत सत्ताधारी भाजपाने मोठा भ्रष्टाचार चालवला असल्याचे आरोप करत त्यांनी बीएसयुपी योजना कामाची निविदा, उद्याने आदी देखभालीसाठी ठेक्याने देण्याचे काम, परिवहन ठेक्यातील गैरप्रकार आदींची उदाहरणे त्यांनी दिली होती. तर आ. गीता जैन यांनी शहरात एका व्यक्तीचा विकास झाला, असा आरोप करत भाजपाला शहरात चांगली लोकं नको आहेत, असे सांगत टीकेची झोड उठवली होती.

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले उपस्थित होते. म्हात्रे यांनी आ. गीता जैन यांच्यावर टीकेची उडवली. गीता जैन या भाजपच्या महापौर होत्या त्या काळात पण भ्रष्टाचार झाला का? त्या म्हणतात भाजपाच्या सत्ता काळात विकास झाला नाही मग त्या महापौर असताना शहरासाठीच्या १३५ दशलक्ष लिटर पाणी योजनेचे उद्घाटन झाले, सिमेंट रस्त्यांसाठी निधी मिळाला, आदी विकास कामे झाली नाहीत का? असे सवाल म्हात्रे यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी