31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयभाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची; राज्यातील हिंसेवरून पवारांचा हल्लाबोल

भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची; राज्यातील हिंसेवरून पवारांचा हल्लाबोल

टीम लय भारी

नागपूर: त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल करतानाच भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर चढवला(BJP’s role is to add fuel to the fire; Pawar’s attack on state violence)

नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी हा टोला लगावला. सध्या सांप्रदायिक विचार, जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न होतोय.

BJP : ‘भाजपा म्हणजे भंगार पक्ष, पराभवानंतर तेसुध्दा ….

BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’

जातीवादी विचार माणसामाणासात द्वेष निर्माण करत आहे. हा विचार राबवणाऱ्या शक्तिंना खड्यासारखं बाजूला ठेवणं आपलं कर्तव्य आहे.

आदिवासी अशा शक्तींना कधीही बळी पडत नाही, असं पवारांनी सांगितलं. त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल त्यांनी केला. भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

BJP : भाजपाला पोस्टरबाजी आली अंगलट ! पोस्टरवरील ‘तो’ शेतकरीच करतोय दिल्लीत आंदोलन

Mamita Murder Case: BJP Lambasts Minister Dibya Shankar Over ‘Self Clean Chit’

वनवासी शब्द अमान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी संमेलनात वनवासी हा शब्द वापरला. त्यांच्या भाषणात आदिवासी हा शब्दच नव्हता. पण आदिवासी समाजाला वनवासी शब्द मान्य नाही, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. आदिवासी हा जंगलाचं रक्षण करण्याचं काम करतोय. जल, जमीन, जंगलाचं रक्षण आदिवासी करत आहे. त्यामुळे आदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं पवारांनी सांगितलं.

शेतीवरचा भार अडीच पटीने वाढला

स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 80 टक्के लोक शेती करत होते. तेव्हा 35 कोटी लोक संख्या होती. आता 112 कोटी लोकसंख्या आणि 60 टक्के लोक शेती करत आहेत. म्हणजे शेतीवरचा लोकांचा भार अडीच पटीने वाढला आणि जमिनीवरचा कमी झाला. आपण विकासाची कार्यक्रम हाती घेतो.

कोणताही कार्यक्रम हाती घ्यायचा असेल तर जमिनीची गरज असते. त्यामुळे शेतीचं प्रमाण कमी होत असून शेतकऱ्यांवर ताण येत आहे, असं त्यांनी सांगितलं. विकास कामात जमिनी हव्या असल्याने शेतीची जमीन उद्योगाला देण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तर शेतकरी आंदोलन करू

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी द्यावा. वेळप्रसंगी सरकारने कर्ज काढावं. पण शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिलासा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. संसदेच्या आगामी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू.

जर संसदेत सत्ताधाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, तर देशभर शेतकरी आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी