30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयभाजपचा धक्कादायक आरोप, नवाब मलिक डान्सबार चालवायचे

भाजपचा धक्कादायक आरोप, नवाब मलिक डान्सबार चालवायचे

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक केली. ही अटक मनी लॉन्डिरग प्रकरणी करण्याक आली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.(BJP’s shocking allegations, Nawab Malik used to run a dance bar)

विरोधी पक्ष नेते मालिकांवर झोखून आरोप करताना दिसत आहेत. यात आता भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्यावर एक धक्कादायक आरोप केलेयत. ते म्हणाले, नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे असं मोहित कंबोज म्हणालेत. मलिक यांनी बांगलादेशी मुलींना भारतात आणून त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकलणे देखील त्यांनी केला आहे , असा दावा कंबोज यांनी केलाय.

मोहित कंबोज आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेताना म्हणाले, आम्ही अनेक मुलींची स्टिंग ऑप्रेशन्स केली असून त्यामध्ये मुलींनी नवाब मलिकांनी आपल्याला जबरदस्तीने वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याची कबुली दिली आहे. हे पुरावे आपण लवकरच तपास यंत्रणांकडे देणार असल्याचं देखील कंबोज म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

“कधीही आवाज द्या,मी साथ देईन,” म्हणत हिंदुस्थानी भाऊ आले मोहित कंबोज यांच्या मदतीला

हर्बल तंबाखूने नवाब मलिक यांच्या डोक्यातील नसा डॅमेज केल्याचे दिसत आहे ,भाजप नेत्याची टिका

महाराष्ट्राच्या राजकारणातील सलीम-जावेद नक्की कोण? भाजपची खोचक टीका

No question of Nawab Malik’s resignation, says Maharashtra’s MVA government

मलिकांच्या जावयाचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलर्सशी संबंध असल्याचही कंबोज म्हणालेत. शिवाय मलिक यांनी संविधानाच्या संरक्षणाची शपथ घेतली मात्र पदाचा दुरुपयोग केल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे. देशहितापेक्षा काहीही महत्वाचे नसल्याने यावरुन राजकारण करु नये असा कंबोज यांनी त्यांना टोला लगावला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी