30 C
Mumbai
Sunday, June 30, 2024
Homeराजकीयकाँग्रेसच्या वेळकाढूपणाचा असाही फटका, मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर

काँग्रेसच्या वेळकाढूपणाचा असाही फटका, मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : मंत्रीमंडळाचा विस्तार होणार म्हणून ‘महाविकास आघाडी’ला मुहूर्त सापडला होता. त्यासाठी आजचा दिवस मुक्रर करण्यात आला होता. पण या मुहूर्तालाही मांजर आडवे गेले आहे. काँग्रेसच्या वेळकाढूपणामुळे आजचा संभाव्य मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे. आता येत्या ३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, असे सूत्रांनी सांगितले.

नव्या मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचे याबाबत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे. काँग्रेसच्या यादीला दिल्लीतील हायकमांडची अजून मान्यता मिळालेली नाही. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यादीला अंतिम मंजुरी घेण्यासाठी दोन दिवसांपासून नवी दिल्लीत आहेत. पण काल झारखंडमधील विधानसभेचा लागलेला निकाल, आणि त्यानंतर येत्या २८ डिसेंबर रोजी काँग्रेसचा असलेला स्थापना दिवस या दोन कारणांमुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना यादीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे मंत्रीमंडळाचा हा विस्तार अखेर ३० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शरद पवारांचा टोला

काँग्रेसच्या यादी विलंबाबद्दल शरद पवारांनी टोला हाणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अशी कामे रेंगाळत ठेवायची सवय नाही. आम्हाला कुणाकडे यादी घेऊन जावे लागत नाही, अशा शब्दांत पवार यांनी काँग्रेसची खिल्ली उडविली आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार हे ठरविण्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहेत, अशी प्रतिक्रिया पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर पवार व उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

खातेवाटपाबद्दल शिवसेना – राष्ट्रवादीतही कुरबुरी

नगरविकास व गृह या दोन खात्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. परंतु ही दोन्ही खाती शिवसेना सोडायला तयार नाही. नगरविकास खात्याच्या माध्यमातून महापालिकांवर वर्चस्व ठेवता येते. त्यामुळे नगरविकास खाते सोडण्याची तयारी शिवसेनेची नाही.

हे सुद्धा वाचा

मंत्रीमंडळात अशोक चव्हाण यांचा समावेश होणार, पृथ्वीराज चव्हाणांवर मात्र टांगती तलवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी