30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय'बाकीच्या जागा जिंकता येतील पण बारामती...' चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

‘बाकीच्या जागा जिंकता येतील पण बारामती…’ चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

राज्यात काही दिवसांपासून सत्ता संघर्षाला एक वेगळेच वळण पहायला मिळाले आहे. शिंदे गटाप्रमाणे आता राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत. अजित पवारांनी ८ आमदारांसह भाजप आणि शिंदे गटाशी युती करत सत्ता स्थापन केली आहे. यानंतर आता काही दिवसांपूर्वी पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्री हे पद काढून घेण्यात आले. त्याऐवजी अजित पवारांना हे पालकमंत्री पद देण्यात आले. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री हे पद दिले आहे. अजित पवारांना पालकमंत्री पद देण्यामागचे कारण आता चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

बारामती जिंकण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री पद सोडणे म्हणजे मोठ्या कामांसाठी केलेली छोटी गोष्ट होय,असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीवर बारामती लोकसभा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावर आता चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना पुण्याच्या पालकमंत्री पदावर का बसवण्यात आले य़ाबाबत गैप्यस्पोट केला आहे. बारामती लोकसभा निवडणुक जिंकायची आहे. आता जिंकली नाही तर कधीच जिंकता येणार नाही, यामुळे पुण्याचे पालकमंत्री पद हे अजित पवारांकडे जाणे गरजेचे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा

१८०० नागरिकांच्या मृत्यूनंतरही हमास आक्रमक, रशियाची मध्यस्थीची तयारी

मी पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढले – सुप्रिया सुळे

पोरखेळ करताय का? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांचे कान टोचले!

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

बारामती मतदार संघ हा शरद पवार आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. येथील खासदार  सुप्रिया सुळे असून याच ठिकाणी भाजपला सत्ता स्थापन करायची आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी मी पालकमंत्री नाही ही बाब मोठ्या उद्दीष्टासाठी केलेली छोटी तडजोड आहे. देशात तिसर्यांदा जर नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदी निवडूण आणायचे असेल तर देशातील एक एक जागा महत्वाची आहे. तर महाराष्ट्रातील ४८ जागा देखिल महत्वाच्या आहेत. यापैकी बारामतीची जागा ही जिंकायची आहे, कारण ही जागा आज जिंकली नाही तर कधीच जिंकता येणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हाणाले आहेत, याबाबतचे वृत्त एबीपी माझाच्या वृत्तवाहीनीने दिले आहे.

आतापर्यंत बारामतीचा कोणत्याच पक्षाला कधीच पराभव करता आला नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदार संघ आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजप प्रयत्नात आहे. यासाठी अजित पवारांना सोबत घेऊन मोठी शक्ती लावण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी