31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयचंद्रकांत पाटीलांचं सोलापूरवरील प्रेम, विकासकामांसाठी आणणार मोठा निधी

चंद्रकांत पाटीलांचं सोलापूरवरील प्रेम, विकासकामांसाठी आणणार मोठा निधी

मागील वर्षापेक्षा आगामी वर्षामध्ये ८५६ कोटींची मागणी सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारला केली. जिल्हा नियोजनाच्या चार बैठका करणं हा जिल्हा नियोजनाचा कायदा आहे. त्या कायद्याअंतर्गत तिसरी बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये वर्षभर कामाचा आढावा घेण्यात आला. आपण येत्या वर्षामध्ये काय काम करणार आहोत. कामासाठी किती खर्च लागणार आहे. याची मागणी राज्याकडे करायची असते. यामुळे आता तिसरी बैठक झाली असून या बैठकीमध्ये लोकसभेच्या आधी हे पैसे खर्च करता येतात. लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये हे पैसे खर्च करता येत नाही. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हे पैसे खर्च व्हावेत अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सोलापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यामध्ये त्यांनी जिल्ह्या नियोजनाच्या बैठकीबद्दलही सांगितलं आहे.

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलेल्या मागणीबाबतही सांगितलं आहे. पुण्याचे पालकमंत्री असताना २५० कोटींची मागणी केली होती. यामुळे किमान २०० कोटी मिळाले आहे. अनेकदा महानगरपालिकेमध्ये काही दलित वस्त्या आहेत, त्या ठिकाणी पैशांची कमतरता भासते.  रस्ता, महावितरण,शाळेंच्या दुरूस्तीला, प्राथमिक आरोग्य केंद्राला कमी पडतात. कहीवेळा अचानक काही विषय पुढं येत असल्याचं म्हणाले आहेत. हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅमची मशीन घ्यायची आहे. ती मशीन बंद पडल्याने नागरिकांची ओढाताण होत आहे. हे मशीन आणण्यासाठी १२ कोटी रूपयांची आवश्यकता आहे. गेली काही महिन्यांपासून शासनाकडे मागणी केली असली तरीही अजूनही पैसै मंजूर झाले नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा

मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक प्रकाश वाणी यांचं निधन

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीत काय घडलं?

अंतरवाली सराटी ते मुंबई आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची पायी दिंडी

साधारणपणे जिल्ह्याच्या बैठकीमध्ये नियोजनाच्या बैठकींची उत्तरं नाहीत. पहिलं म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र दुसरं म्हणजे जिल्हापरिषदेच्या शाळा आणि तिसरं म्हणजे महावितरण, चौथा रोजगार हमी योजनेबद्दल विषय आला. यामध्ये इतर कोणतंही काम न करता अडीच तास प्रत्येकी एक अशा चार बैठका घेणार आहे. कलेक्टर त्या त्या विषयाचा जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा महावितरण अधिकारी यांना पुर्वतयारी करायला लावणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी