31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रअंतरवाली सराटी ते मुंबई आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची पायी दिंडी

अंतरवाली सराटी ते मुंबई आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची पायी दिंडी

राज्यामध्ये अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणावर मराठा समाजाने सरकरकडे मागणी केली आहे. मात्र सरकारला यावर अजूनही कोणतंच ठोस पाऊल उचलता आलं नाही. मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी सरकारला २४ डिसेंबर अंतिम तारीख दिली होती. मात्र सरकारने ही बाब गंभीर घेतली नाही. यामुळे आता मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईमध्ये पायी जाणार असल्याचं सांगितलं आहे. आगामी २० जानेवारी दिवशी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईला पायी दिंडी करत जाणार असून आझाद मैदानावर (Azad maidan) उपोषण करणार असल्याचं सांगितलं आहे. अंतरवाली सराटी-अहमदनगर-पुणेमार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर जाणार आहेत. (Antarwali sarati)

जालना,शहागड, गेवराई (बीड), अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे असे दिंडी पोहचेल. त्यानंतर पुणे, मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदानावर पायी दिंडीत सहभागी होणार आहे. दिंडीमध्ये अजूबाजूच्या गावातील लोकांनी यायचं आहे. खाण्यापिण्याची सोय करावी, असं जरांगे-पाटील म्हणाले आहेत. यासोबतच त्यांनी मराठा बांधवांना काही सूचना देखील केल्या आहेत.

काय म्हणाले मनोज जरांगे-पाटील?

मनोज जरांगे यांनी पायी दिंडीसाठी काही सूचना केल्या आहेत. यासाठी शांततेत दिंडी करावी. फोटो काढण्यासाठी कोणतीही गर्दी नसावी, तसेच तुकड्या पाडून दिल्या आहेत त्या तुकड्यांमध्येच राहावे, त्याचप्रमाणे आपल्या वाहनामध्ये दोन समन्वयक ठेवावेत, गटतट करायचे नाहीत अशी सर्व मराठा बांधवांना विनंती असल्याच्या सूचना आता मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना केल्या आहेत.

हे ही वाचा

मुंबई एअरपोर्टवर तब्बल ६०० रुपयांचा डोसा

डॉ. अमोल कोल्हे यांनी अजितदादांना पुन्हा झोडपले

के.एल. राहुलचं संयमी शतक

दिंडी ज्या गावातून येणार आहे त्याच गावातील लोकांनी दिंडीच्या ठिकाणी जमा व्हायचं आहे. त्यांनीच दिंंडीतील लोकांना काय हवं आहे ते पाहवं. मुंबईला जाणाऱ्या लोकांना जेवणाची सोय करावी असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले आहेत. आपल्या तुकडीमध्ये कोण आहे हे पाहावं आणि लक्ष घालावं तसेच दिंडीमध्ये कोणाही व्यसन करणार नसल्याचं असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले आहेत.

सर्वांनी दिंडीमध्ये सामील व्हावं

दिंडीमध्ये सर्वांनी सामील व्हावं. श्रीमंत आणि गरीब मराठ्यांनी सामील व्हावं. बाजरी, ज्वारी, तांदूळ, गहू सोबत घ्यावे. त्याचसोबत कपडे, साबण, दूध पावडर, सरपाण, पातेल या वस्तू सोबत घेवून याव्यात असं आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी