31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईमुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक प्रकाश वाणी यांचं निधन

मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक प्रकाश वाणी यांचं निधन

माजी समाज कल्याण अधिकारी तसेच मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक श्री. प्रकाश जगन्नाथ वाणी यांचे ठाणे यांचे येथे रात्री (२७ डिसेंबर रोजी, ९:०० वाजता) वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा  (२८ डिसेंबर) रोजी दुपारी त्यांच्या राहत्या घरुन निघेल, असे प्रकाश यांचे पुत्र मयांक यांनी कळविले आहे.
कै. वाणी यांच्या पश्चात पत्नी सौ. स्वप्ना वाणी, दोन मुले मयांक व मयूर, दोन सुना आश्विनी व प्रियांका आणि नातवंडे सार्थक व क्षितीज असा त्यांचा परिवार आहे.

मुंबई विद्यापीठामध्ये राज्य शासनाने त्यांची निवड केली. यावेळी अनेकदा पेपरफुटीसारखे प्रकरण उदयला आले. यावेळी प्रकाश वाणी यांनी पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्याचं काम केलं आहे. दाखले काढण्यासाठी अनेकदा पालक आणि विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला आहे. यासाठी प्रकाश वाणी यांनी पुस्तक काढलं होतं. या पुस्तकामुळे केवळ विद्यार्थी आणि पालकांना याचा फायदा झाला नाहीतर त्यांना दाखले काढून देणाऱ्यांनाही याचा फायदा झाला आहे. त्यातील अटी नियम इतर घटकांची माहिती त्या पुस्तकामधून सहजरीत्या उपलब्ध होऊ लागली आहे.

हे ही वाचा

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीत काय घडलं?

अंतरवाली सराटी ते मुंबई आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची पायी दिंडी

मुंबई एअरपोर्टवर तब्बल ६०० रुपयांचा डोसा

प्रकाश वाणी हे कर्तव्यकठोर अधिकारी होते. लयभारीचे संपादक तुषार खरात जेव्हा सकाळ माध्यमामध्ये कार्यरत होते तेव्हा वाणी हे तुषार खरात यांचं कौतुक करायचे. तुषार खरात आणि प्रकाश वाणी हे दोघंही परिचित होते. अशातच आता सामान्य जनतेसाठी तळमळीने काम करणारा एक अधिकारी हरपला. ईश्वर त्यांंना सद्गगती देवो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी