24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीयराज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीत काय घडलं?

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीत काय घडलं?

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Raj Thackeray And Eknath Shinde) हे अनेकदा एकमेकांना भेटले आहेत. आजही राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर गेले असताना नेमकं काय घडल? याबाबत राज्यातील जनतेला जाणून घ्यायचं आहे. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची आतापर्यंत एकदा दोनदा नाहीतर तब्बल सहा वेळा एकमेकांची भेट घेतली आहे. मागे काही दिवसांआधी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी टोलनाक्याच्या मुद्द्यावरून चर्चा केली होती. अशातच आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा एकमेकांना भेटले आहेत. त्यांच्यासह बाळा नांदगावकरही होते. यावर राज ठाकरे यांनी मराठा पाट्या, टोलचा प्रश्न, धारावी पुनर्विकास, राम मंदिर आणि मुंबईतील विविध विकासकामं या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट होत आहे. अशातच आगामी निडणुका येत आहेत. यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमध्ये विविध मुद्द्यावर चर्चा झाली आहे. मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास आणि कल्याण आणि डोंबिवलीच्या विषयांवर राज ठाकरे आणि मुख्यनंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. याचवेळी आपल्या काही मागण्या राज ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा

अंतरवाली सराटी ते मुंबई आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांची पायी दिंडी

मुंबई एअरपोर्टवर तब्बल ६०० रुपयांचा डोसा

के.एल. राहुलचं संयमी शतक

राजकीय वर्तुळामध्ये भेटीची चर्चा

काही दिवसांपासून राज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा भेटत आहेत. अशातच आता आगामी निवडणुका देखील जवळ आल्या असून राज आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे राजकारणामध्ये आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. आजच्या भेटीमध्ये विकास कामांबाबत चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीमध्ये राजकीय चर्चा झाल्याचं समजतंय मात्र अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजेत असं अनेकदा बोललं जात होतं. सध्याचं सुरू असलेलं राजकारण पाहता राजकारणाचा चिखल झाल्याचं राज ठाकरे अनेकदा बोलले आहेत. मात्र या चिखलाच्या दलदलिमध्ये आम्हाला फसायचं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. यामुळे आता आपल्या मतावर ठाम राहतील की एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीमुळे वेगळं पाऊल उचलतील हे आगामी निवडणुकीमध्ये कळेलं.

आयोध्येला श्रीरामाच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी राज्यातून अनेकांना निमंत्रण आहे. मात्र शरद पवार आणि राज ठाकरे यांना याबाबत निमंत्रण न दिल्याचं बोललं जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी