34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयआयोध्येत श्रीरामाच्या मंदिरात 'या' पाच मान्यवरांना गाभाऱ्यात प्रवेश

आयोध्येत श्रीरामाच्या मंदिरात ‘या’ पाच मान्यवरांना गाभाऱ्यात प्रवेश

अनेक वर्षांपासून आयोध्यमध्ये श्रीरामाच्या मंदिराचा प्रश्न जसाच्यातसा ठप्प होता. यासाठी अनेक हिंदूंनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं आहे. अनेक पिढ्यांनी यामध्ये आपले जीव गमावले आहेत. यासाठी असंख्य हिंदूंनी आपलं रक्त सांडलं आहे. आता राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी काहीक दिवस बाकी आहेत. अशातच आता प्रतिष्ठेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या कार्यक्रमादरम्यान गाभाऱ्यामध्ये केवळ पाचच व्यक्तींना उपस्थित राहता येणार आहे. पूजेच्यावेळी गाभाऱ्याला पडदा लावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, राम मंदिरामध्ये प्रमुख नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, युपीचे राज्यपाल आनंदीबेल पटेल आणि मुख्य आचार्य गाभाऱ्यामध्ये असणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अभिषेक करण्याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे. यानंतर आता पूजेसाठी आचार्यांचे ३ पथकं तयार करण्यात आली आहेत. याची देशभर चर्चा होऊ लागली आहे. पहिल्या संघाचे नेतृत्व स्वामी गोविंद देवगिरी करतील, जे कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य आहेत. तिसऱ्या संघामध्ये काशीतील २१ विद्वांनांचा समावेश असणार आहे.

हे ही वाचा

चंद्रकांत पाटीलांचं सोलापूरवरील प्रेम, विकासकामांसाठी आणणार मोठा निधी

मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक प्रकाश वाणी यांचं निधन

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीत काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत. याचसह देशातील इतर प्रतिष्ठित मान्यवर, उद्योगपती, चार हजार संतांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहे. शीख आणि बौद्ध धर्मातील सर्वोच्च संतांना पाचारण करण्यात येणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, गायत्री परिवार, कलाविश्वातील मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. मात्र राज्यातील काही नेत्यांना आमंत्रित न केल्याच्या चर्चा आहे.

शरद पवार आणि राज ठाकरे यांना आमंत्रण नाही

आयोध्येमध्ये श्रीरामाच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा काही दिवसांमध्येच पार पडणार होणार आहे. देशभरातून अनेक मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. राज्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांना मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण दिलं नाही. यामध्ये देखील राजकारणाचा मुद्द लपला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शरद पवार यांची रात्री पत्रकार परिषद झाली त्यावेळी माध्यमांनी शरद पवार यांना राम मंदिराच्या उद्घाटनासाठी बोलावलं का? असा सवाल केला असताना नाही म्हणत शरद पवार उत्तरले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी