29 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीयवाघनखांनी काढला आरोपांचा कोथळा, 'ती' वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा

वाघनखांनी काढला आरोपांचा कोथळा, ‘ती’ वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या (१ ऑक्टोबर) लंडनला जाणार आहेत. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकार जी वाघनखे आणणार आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीत, असे आदित्य ठाकरे म्हणतात. तर ही वाघनखे शिवछत्रपतींनी वापरलेली नसून सरकार धादांत खोटे बोलत आहे, असा आरोप करत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी सरकारला चपराक लगावली आहे. एवढेच नाही तर ही वाघनखे तीन वर्षांसाठी आणली जाणार आहेत. त्यामुळे शिवरायांनी वापरलेली वाघनखे भारतात आणत आहोत, असा दावा सरकारने करू नये, असे खडे बोल इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी सरकारला सुनावले आहेत.

शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला. त्यासाठी शिवरायांनी वापरलेली वाघनखे भारतात आणत असल्याचा दावा अनेक दिवस राज्य सरकार आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार करत आहेत. पण लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाची माहिती घेतल्यानंतर ही वाघनखे शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीत, असा उल्लेख असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याला इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही दुजोरा दिला आहे. एवढेच नाही तर साताराचे प्रतापसिंह महाराज यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिणाऱ्या ग्रँड डफ यांना जी वाघनखे भेट दिली ती महाराष्ट्र सरकार तीन वर्षांसाठी परत आणणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने देखील ही वाघनखे तीन वर्षांसाठी आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुगनंटीवार ३ ऑक्टोबर रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयातून वाघनखे आणण्याचा करार करणार आहेत. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी ही वाघनखे महाराष्ट्रात आणली जातील. दरम्यान, कोणतेही वस्तू कायमस्वरुपी न देण्याचे लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाचे धोरण आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली वाघनखे ते तीन वर्षांसाठी भारताकडे देणार आहेत. पण ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली नसल्याचा दावा केला जातोय. त्याबाबत सरकारने अजून कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

हे ही वाचा

राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मराठी अस्मितेला हात, ठिगळ लावलेली अस्मिता नकोच…

विदेश दौऱ्यांवरून आदित्य ठाकरेंनी केली सरकारची धुलाई!

२ हजारांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय, नोटा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

दरम्यान, वाघनखांवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार (शिंदे गट) संजय मंडलिक आणि अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी यावरून आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. मुनगंटीवार जी वाघनखे आणतील ती खरी असतील असे सांगत आदित्य ठाकरेंना स्वत:ची नखं वाघनखे वाटत असावीत, असा टोला संजय मंडलिक त्यांनी लगावला. तर आदित्य ठाकरेंना वाघनखांबद्दल काय माहिती आहे, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी