28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयछगन भुजबळ म्हणतात माझी उमेदवारी दिल्लीतून

छगन भुजबळ म्हणतात माझी उमेदवारी दिल्लीतून

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ < Chhagan Bhujbal > यांनी नाशिकमधून माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीत पेच वाढण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा कायम असतानाही हेमंत गोडसे यांनी प्रचाराचा नारळ फोडत रणशिंग फूंकलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीत पेच वाढण्याची शक्यता आहे. हेंमत गोडसे यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा असतानाच छगन भुजबळ यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर हेमंत गोडसे आता काय भूमिका घेणार याकडे नाशिक आणि राज्याचं लक्ष लागलं आहे.(Chhagan Bhujbal says he will contest from Delhi )

नाशिक लोकसभा मतदारसंघातून माझ्या उमेदवारीचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांनी अचनाक कळवला आहे. मी उमेदवारी मागितली नव्हती आणि उमेदवारी मिळेल यांचीही कल्पना नव्हती. शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी आग्रह लावून धरला आहे. मात्र महायुतीसाठी आम्ही एकत्र काम करू. जागा राष्ट्रवादीला सोडली तर घड्याळ चिन्ह राहील असे भुजबळ म्हणाले.
गावबंदीसंदर्भात गावागावात बॅनरला लागले मला कळलं. पण मी मराठा समाजाला कधीच विरोध केला नाही. मराठा समाजाला सपोर्ट केला आहे. मात्र मी फक्त मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ओबीसीतून नको, एवढच म्हणालो होतो. आता मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. त्याला मीही समर्थन दिलं आहे. त्यामुळे मराठा नेत्यांना माझं सांगणं आहे की निवडणूक निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊदे, असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं आहे.
गावात यायच नाही का ? दलित वंजारी आणि माळी लोकांनी निवडणुकीला उभं राहायचं नाही का? ते तरी सांगा. असे बोर्डस असतील आणि विरोध असेल तर मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. हाच विचार इतर समाज महाराष्ट्रात करेल. त्यामुळे मराठा समाजाला पण अडचण होईल. त्यामुळे असे प्रकार टाळावेत अस भुजबळ यांनी सांगितले.

त्यामुळे मराठा नेत्यांना माझं सांगणं आहे की निवडणूक निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊदे, असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं आहे.
गावात यायच नाही का ? दलित वंजारी आणि माळी लोकांनी निवडणुकीला उभं राहायचं नाही का? ते तरी सांगा. असे बोर्डस असतील आणि विरोध असेल तर मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. हाच विचार इतर समाज महाराष्ट्रात करेल. त्यामुळे मराठा समाजाला पण अडचण होईल. त्यामुळे असे प्रकार टाळावेत अस भुजबळ यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी