31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाशिवआघाडीच्या नेत्यांचे वांद्रेच्या एमईटीमध्ये खलबतं

महाशिवआघाडीच्या नेत्यांचे वांद्रेच्या एमईटीमध्ये खलबतं

लय भारी न्यूज नेटवर्क 

मुंबई : शिवसेना आणि काँग्रेस महाआघाडी एकत्र मिळून सत्तास्थापन करणार आहेत. त्यासाठी आज वांद्रे येथील छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमईटी) येथे तिन्ही पक्षांच्या समन्वय समितींच्या नेत्यांमध्ये बैठक सुरु आहे.

या बैठकीत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलीक, छगन भुजबळ यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या नेत्यांमध्ये बैठक सुरु आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचं सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरु असून, तयारी सुरु आहे. त्यामुळे दररोज बैठकांचे सत्र सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाशिवआघाडीच्या नावाने सरकार सत्तास्थापन होणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी