27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीय१००० कोटी रूपयांसाठी देवेंद्र फडणवीस धावले, जेलमधून आलेल्या व्यक्तीची मुलाखत

१००० कोटी रूपयांसाठी देवेंद्र फडणवीस धावले, जेलमधून आलेल्या व्यक्तीची मुलाखत

गुरज्योत दोन दिवसापूर्वीच जेल मधून बाहेर आलेले आहेत.गुरज्योत यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला गेला आहे. एकूण प्रकरणाबाबत हकीकत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता गुरज्योत यांनी खळबळजनक माहिती आमचे संपादक तुषार खरात यांना सांगितली.

लोकसभा निवडणूक २०२४ नुकतीच पार पडलेली आहे आणि संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे असतानाच धक्कादायक बाब ‘लय भारी’ चे संपादक तुषार खरात यांनी युवक राष्ट्रवादी क्रॉग्रेसचे प्रदेश सचिव सरदार गुरू सिंग उर्फ गुरज्योत यांची मुलाखत घेताना समोर आली(Devendra Fadnavis Ran For 1000 Crore).गुरज्योत दोन दिवसापूर्वीच जेल मधून बाहेर आलेले आहेत.गुरज्योत यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला गेला आहे. एकूण प्रकरणाबाबत हकीकत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता गुरज्योत यांनी खळबळजनक माहिती आमचे संपादक तुषार खरात यांना सांगितली. निवडणूक पार पडण्याच्या काही दिवसांपूर्वी ईशान्य मुंबई मतदार संघामध्ये काही कार्यकर्ते पैसे वाटताना सापडले होते आणि देवेंद्र फडणवीस स्वत: तेथे आले होते.ते कार्यकर्ते भाजप चे असावेत असा संशय होता आणि त्या कार्यकर्त्यांना जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अडवत होते अशा ह्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि गुरज्योत त्यांच्यापैकीच एक आहेत. सदर मुलाखतीत गुरज्योत यांनी एका वोट चे ७,००० असे प्रत्येक मंडळाला ३,००,००० देण्यात आले असा दावा केला.त्याच बरोबर “सिस्टिमला भारतीय जनता पक्षाने हँक केले आहे यामुळे आमचा सिस्टिमवर विश्वास नाही.’असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.अशा अनेक गोष्टींचा उलगडा गुरज्योत यांनी सदर मुलाखतीत केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी