31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणविसांचे टीकास्त्र, ‘महाविकास आघाडी’तील तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला

देवेंद्र फडणविसांचे टीकास्त्र, ‘महाविकास आघाडी’तील तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला

टीम लय भारी

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला आहे असे वक्तव्य केले. तसेच येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा स्वबळावर सत्तेत येईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. गुरुवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते(Devendra Fadnavis said that all the three parties in the Mahavikas Aghadi are holding their breath).

या कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आशा बुचके यांनी आपल्या समर्थकांसहित भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आशा बुचके यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानाचे समर्थन करत देवेंद्र यांनी महाविकास आघाडीत तीन पक्षांचा श्वास कोंडत आहे असे म्हणाले.

भाजपच्या मंत्र्यांचे अनोखे स्वागत, हवेत गोळ्या झाडून केले स्वागत

भाजप आयोजित करणार ‘पोलखोल’ सभा

पुढे ते म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे सरकार सत्तेत आल्यामुळे भाजपाला पक्षविस्तार करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर सत्तेत आणू असे म्हणाले.

त्याचबरोबर आशाताई बूचके यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. भाजप त्यांचा नेहमी सन्मान करेल. तसेच आतला- बाहेरचा, जुना – नवा असा भेद आम्ही करत नाही व आलेल्या नेत्यांची आम्ही काळजी करतो असेही फडणवीस म्हणाले.

आशाताई यांच्या भाजपात प्रवेश करण्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, की आशाताई यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. परंतु भाजपामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल व त्यांना न्याय ही मिळेल असे ते म्हणाले.

‘ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करू इच्छिते’ – संजय राऊत

Devendra Fadnavis writes to Maharashtra CM Uddhav Thackeray, expresses concern at attacks on industrialists in Sambhajinagar

या कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आणि वाहतूक आघाडी संयोजक हाजी अराफत इत्यादी मान्यवर मंडळ ही उपस्थित होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी