29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयसुभेदार मल्हारराव होळकरांचे ऐकले असते तर पानिपत जिंकले असते

सुभेदार मल्हारराव होळकरांचे ऐकले असते तर पानिपत जिंकले असते

प्राची ओले: टीम लय भारी

सुभेदार मल्हारराव होळकर हे एक रणधुरंदर राजकीय मुत्सद्दीपणा असलेले सैनिक होते. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी घडवणारे ते महान व्यक्तिमत्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार होते(Malharrao holkar was a warrior soldier with political diplomacy).

एवढ्या महान पराक्रमी व्यक्रीमत्वाबद्दल इतिहासात अनेक अफवा आहेत. परंतू पुढील माहिती वाचून तुम्हाला सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यातील राजकीय मुत्सद्दीपणा समजेल.

देवेंद्र फडणविसांचे टीकास्त्र, ‘महाविकास आघाडी’तील तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला

IAS अधिकाऱ्याचे अविरत कार्य, ‘कोरोना’ काळात एकही दिवस रजा न घेता कार्यरत

असे मानले जाते की, बाजीराव जेव्हा उत्तरेमध्ये होते तेव्हा त्यांची नजर मल्हाररावांवर (Malharrao holkar) पडली. आणि मग त्यांनी मल्हाररावांना त्यांचा सैन्यात घेतले. हे तथ्य नाही. खरे असे आहे की, मल्हारराव हे त्यांच्या मामांकडे वाढले, तिथूनच ते त्यांच्या सैन्यात सामील झाले. स्वतःच्या मेहनतीमुळे ते पुढच्या पदावर पोहचत राहिले. जेव्हा नंदलाल मंडलोई आणि बाजीराव पेशवे यांच्यात युद्ध सुरू होते, तेव्हा मल्हारराव मंडलोईंच्या बाजूने होते. मल्हाररावांमुळे आपल्याला युद्ध जिंकता येत नाहीये असे जेव्हा बाजीराव पेशव्यांना समजले, तेव्हा त्यांनी मल्हाररावांना पत्र लिहले. या पत्रात त्यांनी तुम्ही समाधानकारक तह करून, मध्यस्ती करा, असे मल्हाररावांना लिहले होते. मल्हाररावांचा तो पराक्रम पाहून , त्यांनी पेशव्यांना केलेली मदत पाहून पेशवे खुश झाले.

1728 च्या पालखेडच्या लढाईत, मल्हाररावांनी निजामाची पूर्ण रसद तोडली. निजामाला पाणी मिळणे देखील मुश्किल करून ठेवले होते. त्यामुळे निजामाने मल्हारराव सारकरांपुढे शरनागती पत्कारली. त्यावेळेस मल्हाररावांना माळव्याची जहागिरी मिळाली. पुढे असेच अनेक पराक्रम दाखवत ते सुभेदार झाले.

Malharrao holkar
सुभेदार मल्हारराव होळकरांचे ऐकले असते तर पानिपत जिंकले असते

दिल्लीची स्वारी

दिल्लीचा बादशहा शहा आलम होता. बादशाहने त्याचा शिपाई साजदखानाला पाठवले. बाजीराव पेशवे देखील त्याच्यावर चालून गेले होते, परंतु साजदखनाचे अफाट सैन्य पाहून बाजीरावांनी माघार घ्यायची ठरवली. त्यावेळेस मल्हाररावांनी युक्ती शोधली. नदी ओलांडून द्वाबमध्ये ( गंगा आणि यमुना नदीच्या मधला प्रदेश) जाऊन दुसऱ्या मार्गाने, साजद खानाला पाठून गाठले. दोन्ही बाजूने कैचीत पकडून मराठा सैन्याने हमला केला. मराठा सैन्यांना घाबरून साजदखान मथुरेला पळून गेला. त्यावेळेस दिल्ली गाठून तिथे मराठा साम्राज्य स्थापन करण्याचे आपल्या हातात असताना देखील, मल्हाररावांचे न ऐकत बाजीराव पेशव्यांनी माघार घेतली. या वेळी मल्हाररावांनी एवढी मेहनत घेऊनदेखील त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. भोपाळच्या लढाईत देखील तसेच झाले.

परंतु आता मल्हाररावांचा दबदबा उत्तरेत फार वाढला होता. मल्हाररावांनी पराक्रम करून स्वातंत्र्य सत्ता मिळवली. मल्हारराव हे कधीच पेशव्यांचे चाकर नव्हते. ते पेशव्यांचे बरोबरीचे भागीदार होते, सहकारी होते. उत्तरेतील शत्रूंपासून दक्षिणेला वाचवणारे ते एक कडेकोट किल्ला होते. त्याचबरोबर मल्हाररावांनी इंदोरला एक व्यापारी शहर बनवलं.

दिल्लीच्या बादशहावर अंकुश मिळवत त्यांनी 1752 मध्ये संरक्षणाचा करार केला. शिंदे-होळकर वैर आपण वाचलेच आहे. पण ते वैर शिंदेंनी जपले होते. मल्हाररावांनी शिंदेंबद्दल कधीही वैरभाव जपला नाही.

1758 मध्ये मराठा फौजा अटकेपार पोहचल्या होत्या. अब्दाली तेव्हा इराणच्या शहाशी संघर्षात गुंतलेले होता. अब्दाली अडचणीत आहे, याचा फायदा घेऊन हा प्रदेश ताब्यात घ्यावा अशी मसलत मल्हाररावांनी रघुनाथरावांना दिली होती, परंतु तेव्हा देखील मल्हाररावांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

भारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट बनल्या होमाई व्यारावाला

Ahilyabai Holkar: Reminiscing the legacy of one of India’s finest administrators on her 226th death anniversary

पानिपत युद्ध

शिंदे होळकरांनी शहावली खानाशी 22 नोव्हेंबर 1760 साली युद्ध केले होते. हे युद्ध पानिपत युद्ध सुरु होण्याच्या दीड महिना आधी केलेले. परंतु ज्या मल्हाररावांनी अटकेपार जाऊन मराठी साम्राज्य वाढवले त्याच मल्हाररावांवर पानिपतचे मैदान सोडून पळून जाण्याचे आरोप केले जातात. एवढा महान लढवय्या मैदान सोडून कधी पळून जाऊ शकतो का?

शेवटी वेळ आली ती, पानिपतच्या युद्धाची. 14 जानेवारी 1761 रोजी हे युद्ध सुरू झाले. अब्दालीवर सरळ चालून न जात, त्याच्यावर गनिमी काव्याने हल्ला करावा असे मत मल्हाररावांनी भाऊसाहेब पेशवेयांच्यासमोर मांडले. होळकरांचे हे युद्धतंत्र डावलून भाऊंनी इब्राहिम गारदीच्या विलायती पद्धतीच्या गोलाची कल्पना युद्धतंत्र म्हणून ठरवली. ज्या शिवरायांची गनिमिकावा पद्धत वापरत होळकरणांनी आजवर शेकडो लढाया लढवल्या, त्याच यावेळेस कामाला येतील असा विश्वास होळकरांना होता. परंतु, भाऊसाहेब पेशवे यांनी स्वतःच्या मनाचा कारभार करत, शत्रूला हूल देऊन पळून जाण्यापेक्षा, गोल करून युद्ध लढवायचे ठरवले. तसेच सदाशिव भाऊंनी मल्हारराव सरकारांनी नर्मदा ओलांडून जाऊ नये असे सांगून सुद्धा, नदी ओलांडली, असे मल्हाररावांचे अनेक निर्णय डावलले गेले. तरी देखील मल्हाररावांनी (Malharrao holkar) पानिपत युद्ध शेवट पर्यंत लढले.

विश्वासराव कोसळले हे बघून सेनापती असलेल्या भाऊरावांनी खाली मैदानात उडी घेतली. सैनिकांना आपला सेनापती घोडयावर दिसला नाही. त्यांना वाटले की आपला सेनापती देखील कोसळला आणि त्यांची युद्ध ताकदच कमी झाली. त्याचबरोबर पैशांची उणीव भासली, उत्तरेतील थंडीचा अंदाज भाऊसाहेबांना घेता आला नाही, त्यामुळे सैनिकांचे हाल झाले. या युद्धात स्त्रियांचा देखील समावेश होता. भाऊसाहेब पेशवे यांच्या पत्नी पार्वतीबाई देखील या युध्दात होत्या. मल्हारराव होळकर हे स्त्रियांना वाचवण्यासाठी गेले असताना, पार्वतीबाई आधीच निघून गेले असल्याचे त्यांना समजले आणि त्यांची भेट मग पुढे रस्त्यात झाली. अशी ही गोष्ट आहे. परंतु काही इतिहासकारांनी सुभेदार मल्हारराव होळकर यांना बदनाम केले.

ते मैदान सोडून पळून गेले असे सांगण्यात आले. एवढा महान रणधुरंदर मुत्सद्दीपणा असेलेले मल्हारराव(Malharrao holkar)कधीच रणांगण सोडून, तिथल्या स्त्रियांना सोडून पळून जाणार नाहीत. ज्या मल्हाररावांनी स्त्रियांवर त्याकाळात स्त्रियांवर एवढी बंधी असताना देखील, सुनेला मुलीप्रमाणे वाढवले. स्त्रीशिक्षण समाजात मान्य नसताना देखील त्यांनी अहिल्यादेवींना लेखन वाचन शिकवले. युध्दाचे ज्ञान दिले. राजकीय मुत्सद्दीपणा शिकवला. त्यांच्या पत्नी गौतमाबाई यांचा देखील त्यांनी नेहमी आदर केला. ते पानिपतच्या युद्धभूमीत उतरलेल्या स्त्रियांना सांभाळण्याची जबाबदारी सोडून कधीच पळून जाणार नाहीत.

पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला. अनेक।मोहीम केल्या, त्या जिंकल्या. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या. अश्या ह्या महान लढाऊ व्यक्तिमत्वाला त्रिवार वंदन.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी