32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडेंचे नवे स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाले

धनंजय मुंडेंचे नवे स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाले

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : आमदार धनंजय मुंडे यांनी ताजे स्पष्टीकरण जारी केले आहे. मी पक्षासोबत व आदरणीय पवारसाहेबांसोबत असल्याचे ट्विट मुंडे यांनी केले आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हे स्पष्टीकरण केले आहे.

अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात बंड करून भाजपशी घरोबा साधला. अजितदादांसोबत धनंजय मुंडे हे सुद्धा गेले होते. परंतु शनिवारी सकाळी अजित पवारांबरोबर गेलेले धनंजय मुंडे संध्याकाळी मात्र शरद पवारांकडे परतले. पण अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन जाण्यामध्ये धनंजय मुंडे यांचाच मोठा वाटा असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मुंडे शरद पवारांकडे परतले असले तरीही ते मनाने अजित पवारांसोबतच असावेत. विधानसभेतील संभाव्य बहुमत चाचणीमध्ये मुंडे अजितदादांची बाजू घेऊ शकतात, अशीही भिती व्यक्त केली जात होती. परंतु मुंडे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मी पक्षासोबत आहे, मी आदरणीय पवार साहेबांसोबत. कृपया कोणताही संभ्रम निर्माण करू नये ही विनंती.’ असे मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

‘शरद पवार भाजपला पाठींबा देणार, शिवसेनेतही भूकंप होणार’

…आमदार खरेदी विक्रीचा बाजार तेजीत, आमदार फोडण्यासाठी ‘हे’ नेते लागले कामाला

‘भाजपकडे १७० आमदारांचे संख्याबळ’

अजित पवारांच्या नव्या दाव्याने खळबळ : मी राष्ट्रवादीतच, शरद पवार आपले नेते

‘शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी