30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeराजकीयVIDEO : ठाकरे सरकार धनगरांची दखल घेत नाही, म्हणून आज पुन्हा आंदोलन

VIDEO : ठाकरे सरकार धनगरांची दखल घेत नाही, म्हणून आज पुन्हा आंदोलन

टीम लय भारी

मुंबई : गेल्या दहा दिवसांत धनगर समाजाने दोन आंदोलने केली. तरीही उद्धव ठाकरे सरकारकडून दखल घेतली जात नाही, म्हणून आज ( सोमवार ) पुन्हा तिसरे आंदोलन करण्यात येणार आहे ( Dhangar community agitation on today ).

अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, धनगर समाजासाठी एसटीच्या विविध योजना लागू कराव्यात अशी मागणी आहे ( Dhangar community aggressive for ST reservation ). त्यासाठी धनगर समाजाकडून आंदोलने करण्यात येत आहेत.

हे सुद्धा वाचा

Balasaheb Thorat : …तोपर्यंत काँग्रेसचा शेतक-यांसाठी संघर्ष सुरुच रहाणार : बाळासाहेब थोरात

धनगर आरक्षण कृती समितीचा ठराव : ठाकरे सरकारने केंद्राला आरक्षणाची शिफारस करावी, मोदी सरकारने ते अंमलात आणावे

VidhanParishad 12 seats appointment : धनगरांना भाजपचा आसरा, महाविकास आघाडीकडून मात्र काणाडोळा

राज्यभरात आंदोलनांचा आगडोंग उसळला आहे. तरीही उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चेची तयारी दर्शविली नाही. त्यामुळे आज तिसऱ्यांदा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर एसटी आरक्षण लढा समन्वय समितीचे समन्वयक गणेश हाके व प्रकाश शेंडगे यांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

या आंदोलनासाठी धनगर समाजातील प्रमुख १८६ नेते एकत्रित आले आहेत. यांत गणपतराव देशमुख, अण्णा डांगे, महादेव जानकर, रामराव वडकुते, विकास महात्मे, गोपीचंद पडळकर, रामहरी रूपनवर, उत्तम जानकर यांच्यापासून सगळे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. सर्व नेत्यांनी मिळून नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेतल्याची माहिती शेंडगे व हाके यांनी दिली ( 186 leaders united for Dhangar reservation ).

मुंबईपासून ते राज्यातील कानाकोपऱ्यात धनगर समाजातील कार्यकर्ते आंदोलने करतील. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिलदार यांच्या कार्यालयासमोर ही आंदोलने केली जातील, असे गणेश हाके यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी